शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

...हिच्या ओरडण्याचे काही तरी करा! आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये बेलारशियन खेळाडूच्या सवयीला प्रेक्षक वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 21:23 IST

आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अमेरिकेच्या कोको वांदेवेघेच्या केळी हट्टाच्या चर्चा राहिली तर आज दुसऱ्या दिवशी बेलारूसच्या एरिना साबालेंकाच्या सामन्यादरम्यानच्या जोरदार आवाजाची चर्चा राहिली.

मेलबोर्न  - आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अमेरिकेच्या कोको वांदेवेघेच्या केळी हट्टाच्या चर्चा राहिली तर आज दुसऱ्या दिवशी बेलारूसच्या एरिना साबालेंकाच्या सामन्यादरम्यानच्या जोरदार आवाजाची चर्चा राहिली. ही १९ वर्षीय बेलारशियन खेळाडू आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅशली बार्टीकडून तीन सेटमध्ये पराभूत झाली परंतु तिच्या खेळापेक्षा प्रत्येक फटक्यावेळी ती करणाऱ्या जोरदार आवाजाचीच चर्चा राहिली. साबालेंकाच्या आवाजापायी प्रेक्षकही एवढे हैराण झाले की त्यांनी नंतर-नंतर तिच्या ओरडण्याचीच नक्कल करायला सुरूवात केली आणि पंचांना सामन्यादरम्यान शांतता राखण्याचे वारंवार आवाहन करावे लागले. साबालेंकाच्या हा आवाज ट्विटरवरही ट्रेंडिंग राहिला. बऱ्याच माजी टेनिसपटूंनी तिच्या आवाज करण्याच्या सवयीबद्दल कॉमेंट टाकल्या. पॅम श्रायव्हर म्हणाली की साबालेंका ३४७ प्रकाराचे वेगवेळे आवाज काढू शकते ही खरोखरच विलक्षण टॅलेंट आहे. टॉड वूडब्रिज म्हणाला की साबालेंका चांगली खेळाडू आहे पण तिच्या आवाजाबद्दल काहीतरी करायला हवे. रिच ग्रेगरी म्हणाला की नियमांत बदल करण्याची गरज आहे तर निक वेडच्या मते टेनिससाठी ही गोष्ट नवीन नसली तरी पंच किंवा अधिकारी त्याबद्दल खेळाडूंवर काहीच कारवाई का करत नाहीत? साबालेंकाचा आवाज अनावश्यक मोठा होता आणि सामना बघणे कठीण झाले होते. 

या आवाजावरूनच एक प्रासंगिक विनोद झाला. तो असा की गतविजेता रॉजर फेडररच्या सहज विजयाच्या सामन्यादरम्यान मध्येच बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे रॉड लेव्हर कोर्टवर स्वत: फेडरर व प्रेक्षकांचे लक्ष विचलीत झाले. त्यावेळी फेडररने हजरजबाबीपणे ‘तो माझा आवाज नाही?’ असे म्हणताच तेथे हास्यकल्लोळ झाला.

 स्टार महिला टेनिसपटू युजिनी बौचार्ड ही कॅनडाची असली तरी मेलबोर्नमध्ये म्हणजे आॅस्ट्रेलियात तिला खंदे समर्थक मिळाले आहेत.  तिच्या साधारण डझनभर आॅस्ट्रेलियन समर्थकांनी जिनी आर्मी नावाचा तिचा समर्थक गटच बनवला आहे. दोन नंबरच्या कोर्टवर बौचार्ड विजयासाठी संघर्ष करत असताना जिनी आर्मीचे लाल पँट आणि पांढरे टी-शर्ट घातलेले सदस्य तिचा उत्साह वाढवत होते. यासाठी लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर त्यांनीतिच्या नावाचा घोष चालवला होता.२०१४ पासून ही जिनी आर्मी तिचे समर्थन करत आली आहे आणि पुढच्या सामन्यावेळी त्यांना बौचार्डच्या समर्थनासाठी पूर्ण जोर लावावा लागणार आहे कारण तिचा पुढचा सामना नंबर वन सिमोना हालेपशी आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडा