शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

यूएस ओपनमध्ये स्लोएन स्टिफन्स अजिंक्य, मेडिसन किजचा केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 02:01 IST

न्यूयॉर्क, दि. 10 -  अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळ केलेल्या स्लोएन स्टीफन्स हिने मेडिसन किजचा अवघ्या एका तासामध्ये धुव्वा उडवत यूएस ओपन महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अमेरिकन खेळाडूंमध्ये झालेल्या या लढतीत स्टीफन्सने बाजी मारत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावले. विशेष म्हणजे डाव्या पायाला झालेल्या दुखापतीनंतर स्टीफन्सने ११ महिन्यांच्या कालावधीनंतर ...

न्यूयॉर्क, दि. 10 -  अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळ केलेल्या स्लोएन स्टीफन्स हिने मेडिसन किजचा अवघ्या एका तासामध्ये धुव्वा उडवत यूएस ओपन महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अमेरिकन खेळाडूंमध्ये झालेल्या या लढतीत स्टीफन्सने बाजी मारत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावले. विशेष म्हणजे डाव्या पायाला झालेल्या दुखापतीनंतर स्टीफन्सने ११ महिन्यांच्या कालावधीनंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते.स्टीफन्सने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे जेतेपद उंचावताना किजचा ६-३, ६-० असा सहज धुव्वा उडवला. त्याचप्रमाणे, २००२ नंतर पहिल्यांदाच यूएस ओपनची अंतिम लढत अमेरिकन खेळाडूंमध्ये झाली. स्टीफन्सने या वेळी बिगरमानांकित खेळाडू म्हणूनहीछाप पाडली. याआधी २००९ मध्ये किम क्लाइस्टर्सने निवृत्तीनंतर पुनरागमन करताना बिगरमानांकित खेळाडू म्हणून यूएस ओपनचे जेतेपद उंचावले होते.१५ मानांकित किजचा अंतिम लढतीत अत्यंत निराशाजनक खेळ झाला. विशेष म्हणजे दोघीही कारकिर्दीत पहिल्यांच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळत होते. त्यामुळेच तिच्यावरील दडपण स्पष्ट दिसत होते. स्टीफन्सने स्पर्धेतील धडाका अंतिम सामन्यातही कायम ठेवताना पहिल्या सेटमध्ये दोन गेमची आघाडी घेतल्यानंतर किजने पुनरागमनाचे प्रयत्नच सोडले. पहिला सेट मोठ्या फरकाने गमावल्यानंतर दुसºया सेटमध्ये तिच्याकडून पुनरागमनाची अपेक्षा होती. परंतु, किज स्टीफन्सपुढे एकदाही आव्हान उभे करू शकली नाही आणि स्टीफन्सने अखेरपर्यंत आक्रमक पवित्रा राखताना किजचा सहज धुव्वा उडवला. (वृत्तसंस्था) स्लोएन पाचवी बिगरमानांकित खेळाडू १९७६ नंतर पहिल्यांदाच यूएस ओपनमधील उपविजेती खेळाडू अखेरच्या सेटमध्ये एकही गेम जिंकू शकली नाही. याआधी ख्रिस एव्हर्टने अंतिम लढतीत इवोन गुलागोंगला ६-३, ६-० असे नमवले होते. स्टीफन्सने अंतिम सामन्यात केवळ ६ चुका केल्या, तर किजने तब्बल ३० चुका केल्या. स्टीफन्सने आपल्या गेल्या १७ सामन्यांतील १५ सामने जिंकले आहेत.ग्रँडस्लॅम जिंकणारी स्टीफन्स केवळ पाचवी बिगरमानांकित खेळाडू ठरली. याआधी यंदा लात्वियाच्या येलेना ओस्तापेंकोने फ्रेंच ओपन जिंकले.मी अंतिम लढतीत माझा सर्वोत्तम खेळ केला नाही आणि यामुळे मी निराश आहे. पण स्लोएनने खूप समर्थन केले. जर या लढतीत मला हरायचेच होते, तर स्लोएनकडून पराभव झाल्याचा आनंदच आहे. ती माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी एक आहे.- मेडिसन किज