शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना विलियम्सने पंचांना खोटारडा, चोर म्हटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 01:23 IST

सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपनचे जेतेपद गमाविल्यानंतर टेनिस खेळ लिंगभेद करणार असल्याचा आरोप केला.

न्यूयॉर्क : सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपनचे जेतेपद गमाविल्यानंतर टेनिस खेळ लिंगभेद करणार असल्याचा आरोप केला. अंतिम लढतीनंतर निकालापेक्षा अधिक चर्चा सेरेना व खुर्ची पंच यांच्यादरम्यान झालेल्या वादाबाबत होत आहे. सामन्यादरम्यान दुसऱ्या सेटममध्ये सेरेनाला अम्पायर कार्लोस रामोस यांनी बॉक्समधून कोचिंग घेत असल्याप्रकरणी ताकीद दिली. त्यानंतर रॅकेट फाऊलसाठी या ३६ वर्षीय खेळाडूला दुसºयांदा आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताकीद दिली व एका गुणाची पेनल्टी दिली. त्यामुळे अमेरिकन खेळाडूचा राग अनावर झाला आणि तावातावात अम्पायरकडे कूच करीत त्यांना खोटारडे व चोर असे संबोधले.तिने पंचाला माफी मागण्यासही सांगितले. अंतिम सामन्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना सेरेना म्हणाली, ‘ते माझ्यावर अप्रामाणिक असल्याचा आरोप करीत होते. मी कोर्टवर असताना प्रशिक्षकाकडून कोणतेही टीप्स घेण्याचा प्रयत्न करत नाही.’ तसेच, ‘यामुळे कोर्टवर महिला व पुरुष खेळाडूंसोबत वेगवेगळे वर्तन होते, याची मला प्रचिती आली. मी येथे महिला अधिकारांसाठी व महिलांना बरोबरीचा हक्क मिळवून देण्यासाठी लढत आहे,’ असेही तिने सांगितले.सेरेनाने याआधीही घातली होती पंचांशी हुज्जतदिग्गज सेरेना विलियम्सने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यादरम्यान पंचांवर नाराजी व्यक्त करताना हुज्जत घातली. ही तिच्याकडून घडलेली पहिलीच घटना नाही. याआधीही ती अशा वर्तनामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.२००९ मध्ये किम क्लाइस्टर्सविरुद्ध उपांत्य फेरीतही सेरेनाने पंचांविरुद्ध अपशब्द वापरले होते. त्यावेळी, क्लाइस्टर्सला कोणतीही रँकिंग नव्हती आणि तिने सेरेनाविरुद्ध पहिला सेट जिंकला. त्यातच हताश होऊन रॅकेट जमिनीवर आदळल्यामुळे सेरेनाला ताकीदही देण्यात आली. सेरेना दुसºया सेटमध्ये ५-६ वर टायब्रेकरमध्ये सर्व्हिस करीत होती. तेव्हा तिने पाय लाईनच्या पुढे गेल्यामुळे तिला ताकीद देण्यात आली आणि क्लाइस्टर्सला डबल मॅच पॉइंट मिळाला. त्यामुळे सेरेनाने पंचांशी हुज्जत घातली आणि नंतर सर्व्हिस लाईनवर जात लाईनवुमनविरुद्ध अपशब्दाचा उपयोग केला. त्यात तिने धमकावल्याचाही समावेश होता.

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्स