शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यूएस ओपनमध्ये सेरेना, स्टीफन्स यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 00:09 IST

यूएस ओपनमध्ये सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने बिगरमानांकित काइया कैनेपीचा रविवारी ६-०, ४-६, ६-३ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.

न्यूयॉर्क : यूएस ओपनमध्ये सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने बिगरमानांकित काइया कैनेपीचा रविवारी ६-०, ४-६, ६-३ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.२३ ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावणाºया सेरेनाने पहिल्या सेटमध्ये काइयाचा केवळ १८ मिनिटांमध्ये पराभव केला. पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिमोना हालेपचा पराभव करणाºया काइयाने दुसºया सेटमध्ये दमदार पुनरागमन करताना ६-४ ने सरशी साधत रंगत कायम राखली. तिसºया सेटमध्ये अनुभवी सेरेनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला अधिक संधी न देत विजयावर शिक्कामोर्तब केले. सेरेनाला उपांत्यपूर्व फेरीत आठव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. कॅरोनिलाने आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅशलिघ बार्टीचा ६-४, ६-४ ने पराभव केला.विद्यमान चॅम्पियन व तिसरे मानांकन प्राप्त स्लोएन स्टीफन्सनेही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. तिने एलिस मर्टेन्सचा ६-३, ६-३ ने सहज पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत स्लोएनला लात्वियाच्या अनास्तासिजा सेवास्तोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सेवास्तोवाने उपउपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित एलिना स्वितोलिनाची झुंज ६-३, १-६, ६-० ने मोडून काढली. स्वितोलिनाच्या पराभवामुळे आता स्पर्धेत अव्वल १० पैकी केवळ दोन खेळाडू शिल्लक आहेत. (वृत्तसंस्था)नदाल, डेल पेत्रो, इस्नरची आगेकूचगतविजेत्या राफेल नदालने रविवारी आठव्यांदा अमेरिकन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. नदालला आता डोमिनिक थिएमच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. नदाल २०१८ मध्ये केवळ तीन खेळाडूंविरुद्ध पराभूत झाला. त्यात थिएमचा समावेश आहे.जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नदालने निकोलोज बसिलाशविलीचा ६-३, ६-३, ६-७ (६/८), ६-४ ने पराभव केला. निकोलोज अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत दाखल होणारा जॉर्जियाचा पहिला खेळाडू आहे.

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सTennisटेनिस