शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-शोएबच्या घरी पाळणा हलणार; ट्विटरवर दिली गोड बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 21:08 IST

सोशल मीडियावर अनेकांकडून दोघांचं अभिनंदन

नवी दिल्ली: टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. ऑक्टोबरमध्ये सानिया आणि शोएबच्या घरी पाळणा हलणार आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिकनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. यावरुन सानिया मिर्झा गरोदर असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर सानिया मिर्झाच्या वडिलांनी या वृत्ताला दुजोरा दिला. 'सानिया गरोदर असल्याची माहिती खरी आहे. ऑक्टोबरमध्ये सानिया आई होईल, अशी अपेक्षा आहे,' असं सानियाचे वडिल आणि प्रशिक्षक इमरान मिर्झा यांनी सांगितलं. सानिया आणि शोएबनं फोटो ट्विट करताना #MirzaMalik हा हॅशटॅग वापरला. या फोटोत एका बाजूला मिर्झा, तर दुसऱ्या बाजूला मलिक लिहिलेलं दिसतं आहे. या दोघांच्या मध्ये मिर्जा-मलिक लिहिण्यात आलं आहे. या दोघांनी केलेलं ट्विट आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलं आहे. अनेकांनी त्यांचं अभिनंदनही केलं आहे. सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या लग्नाला 12 एप्रिल रोजी 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे सानिया ऑक्टोबर 2017 पासून टेनिस खेळलेली नाही. 

 

सानिया मिर्झानं एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोवा फेस्ट-2018 मध्ये सहभाग घेतला होता. स्त्री-पुरुष भेदभाव या विषयावर या फेस्टमध्ये चर्चा झाली होती. यावेळी बोलताना सानियानं होणाऱ्या अपत्याचा उल्लेख केला होता. 'मी आणि माझे पती याविषयी बोललो आहोत. जेव्हा आम्हाला मूल होईल, तेव्हा त्याचं आडनाव मिर्झा-मलिक असेल, असं आम्ही ठरवलंय,' असं सानियानं म्हटलं होतं. 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिकpregnant womanगर्भवती महिला