शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रॉजर फेडररचा ‘दस का दम’, दहाव्यांदा जिंकली हाले एटीपी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 03:46 IST

टेनिस स्टार रॉजर फेडरर याने विम्बल्डनपूर्वी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा देताना हाले एटीपी स्पर्धेचे दहाव्यांदा जेतेपद पटकावले.

वेस्टफालेन (जर्मनी) : टेनिस स्टार रॉजर फेडरर याने विम्बल्डनपूर्वी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा देताना हाले एटीपी स्पर्धेचे दहाव्यांदा जेतेपद पटकावले. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात स्वित्झर्लंडच्या फेडररने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला.३७ वर्षीय फेडररने पहिला सेट टायब्रेंकमध्ये जिंकल्यानंतर दुसरा सेट सहजपणे जिंकताना गॉफिनचा ७-६, ६-१ असा दणदणीत पराभव केला. यासह आपल्या कारकिर्दीतील १०२ विजेतेपद पूर्ण करतानाच फेडररने हाले स्पर्धा तब्बल दहाव्यांदा जिंकली. या शानदार विजेतेपदासह आत्मविश्वास उंचावलेला फेडरर पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत नवव्या जेतेपदासाठी प्रयत्न करेल. याआधी शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात फेडररने पिएरे ह्यूजेस हर्बर्ट याचा ६-३, ६-३ असा पराभव केला होता.ही अविश्वसनीय कामगिरी आहे. मी जेव्हा पहिल्यांडा या स्पर्धेत खेळलो होतो, तेव्हा कधीही विचार केला नव्हता की मी येथे दहावेळा जेतेपद उंचावेल. याआधी कोणतीही स्पर्धा मी दहावेळा जिंकलेलो नाही. त्यामुळेच ही स्पर्धा माझ्या कायम स्मरणात राहील.- रॉजर फेडरर

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस