शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

200 आठवडे नंबर वन, टू, थ्री; हा विक्रम करणारा रॉजर फेडरर एकटाच! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:01 IST

रॉजर फेडरर हा आता एवढ्या वर्षांपासून टेनिस खेळतोय की दर आठवड्याला त्याच्या नावावर नवनवे विक्रम लागत आहेत.

- ललित झांबरे रॉजर फेडरर हा आता एवढ्या वर्षांपासून टेनिस खेळतोय की दर आठवड्याला त्याच्या नावावर नवनवे विक्रम लागत आहेत. आता तर त्याच्या नावावर असा विक्रम लागलाय की टेनिसच्या इतिहासात क्वचितच कुणाला असा विक्रम करता येईल.  टेनिसच्या जागतिक क्रमवारीत नंबर एक, दोन आणि तीन अशा पहिल्या तीन क्रमांकावर प्रत्येकी किमान 200 आठवडे राहिलेला तो एकमेव टेनिसपटू ठरला आहे. 

गंमत म्हणजे याच फेडररला क्रमवारीत टॉप- टेनमध्ये पोहोचायला त्याला वेळ लागला होता. 2002 मध्ये तो पहिल्यांदा क्रमवारीत टॉप टेनमध्ये पोहोचला होता.तेंव्हापासून गेली दोन दशके तो टॉप टेनमध्ये कायम आहे. 

2003 मध्ये तो पहिल्यांदा विम्बल्डन विजेता बनला त्यावेळी म्हणजे जुलै 2003 मध्ये तो टॉप तीनमध्ये पोहोचला होता. 2004 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाने त्याला पहिल्यांदा सर्वोच्च स्थानी पोहचवले होते. तेंव्हापासून पुढची सलग साडेचार वर्ष (सलग 237 आठवडे) फेडररने अव्वल स्थान स्वतःकडेच कायम राखले होते. तेंव्हापासून 2011 मधील एक-दोन आठवड्यांचा अपवाद वगळता फेडरर 2003 ते 2013 दरम्यान सातत्याने पहिल्या तीनमध्ये कायम राहिला. 2014च्या विम्बल्डन अंतिम फेरीने त्याचे स्थान भक्कम केले. त्याकाळात नदाल, जोकोवीच, मरे यांच्या

स्पर्धेतही फेडररने आपले स्थान ढळू दिले नाही आणि जिमी कॉनर्सचा 590 आठवड्यांचा विक्रम त्याने मागे टाकला. 2016 मध्ये गुडघ्याच्या दुखण्याने फेडररला विश्रांती घेण्यास भाग पाडले. पण पुढल्या वर्षी विम्बल्डन जिंकून तो पुन्हा टॉप- 3 मध्ये पोहोचला. 2018 मध्ये तर वयाच्या 37 व्या वर्षी तो नंबर वन बनला. आता ऑक्टोबर 2018 पासून तो टॉप- 3 मध्ये कायम असून 730 आठवडे टॉप 3  मध्ये त्याने पूर्ण केले आहे. यात जिमी कॉनर्स व राफेल नदालला त्याने मागे टाकले. आता फेडरर क्रमवारीत सर्वोच्च स्थानी 310 आठवडे, दुसऱ्या स्थानी 218 आठवडे आणि तिसऱ्या स्थानी 201 आठवडे आहे. याप्रकारे नंबर 1, 2 आणि 3 अशा तीन स्थानी प्रत्येकी किमान दोनशे आठावडे राहणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस