शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रॉजर फेडरर आणि सेरेना विलियम्स धडकणार आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 01:47 IST

नव्या वर्षाची सुरुवात टेनिस विश्वासाठी आश्चर्यकारक अशी असेल जेव्हा टेनिस इतिहासातील दोन दिग्गज आमनेसामने असतील. स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करताना दिसतील.

पर्थ : नव्या वर्षाची सुरुवात टेनिस विश्वासाठी आश्चर्यकारक अशी असेल जेव्हा टेनिस इतिहासातील दोन दिग्गज आमनेसामने असतील. स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करताना दिसतील. हे शक्य होईल ते हॉपमॅन टेनिस चषकात. विद्यमान चॅम्पियन स्वीत्झर्लंडचा मिश्र दुहेरीचा संघ अमेरिकेविरुद्ध भिडणार आहे. पर्थमध्ये होणारा हा हॉपमॅन चषक शेवटचा असेल. असे असले तरी फेडरर आणि सेरना यांच्या सामन्यावरून अनेक जण उत्साहित आहेत. या दोघांना एकमेकांविरुद्ध खेळण्याची कल्पना टेनिस चाहत्यांना सुखावणारी आणि तितकीच उत्सुकतेची आहे. सेरेना आणि फेडरर यांनी दोघांनी मिळून आतापर्यंत ४३ ग्रॅण्डस्लॅम जिंकलेले आहेत. त्यामुळे या दोघांच्या यशाचा आवाका लक्षात येईल.फेडररने हॉपमॅन चषक स्पर्धेत रविवारी सुरुवातीचा सामना जिंकला. या विजयानंतर तो म्हणाला की, आम्हा दोघांसाठी हा क्षण खूप रोमांचक असेल. मला आशा आहे की हा सामना अधिक टेनिस चाहते पाहतील. सेरेनाने कोर्टवर आणि कोर्टबाहेर जे काही केले त्यावर मी प्रभावित आहे. आम्ही दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी आहोत. नेहमी जिंकण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे हा सामना चांगला होईल. असे पहिल्यांदाच होत आहे आणि पुढेही असेहोईल, याची शक्यता कमी आहे. महिला असो किंवा पुरुष, आमच्या खेळातील ती मोठी प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल, असेही फेडरर म्हणाला.दरम्यान, टेनिसमध्ये महिला आणि पुरुष यांच्यातील सामना १९७३ मध्ये खेळविण्यात आला होता. हा प्रदर्शनीय सामना होता. यामध्ये बिली जीन किंगने रिंग्सचा पराभव केला होता.

टॅग्स :Tennisटेनिस