शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

काटकसरी नदाल, केला इकोनॉमी क्लासमधून प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 10:19 IST

स्पेनच्या राफेल नदालला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाच्या चर्चेनंतर नदाल पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंडिंग टॉपीक ठरत आहे.

लंडन - स्पेनच्या राफेल नदालला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत पराभव पत्करावा लागला. विम्बल्डन स्पर्धेच्या इतिहासातील ही एक रोमांचक लढत ठरली. त्या पराभवाच्या चर्चेनंतर नदाल पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंडिंग टॉपीक ठरत आहे. यावेळी त्याच्या विनयशीलतेमुळे तो चर्चेत आहे.  टेनिसचा हा स्टार खेळाडूने विमानातून चक्क इकोनॉमी क्लासमधून प्रवास केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याने बार्सिलोना ते मॅनकोर हा प्रवास सामान्य प्रवाशांसोबत केला. एअर युरोपाच्या विमानात एक्सिट दरवाजा शेजारील सीटवर बसून नदाल पेपर वाचत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. चाहत्यांनी त्यांनतर नदालची भरभरून प्रशंसा केली. विम्बल्डनच्या उपांत्या फेरीत जोकोव्हिचने 6-4, 3-6, 7-6, 3-6, 10-8 अशा फरकाने नदालला पराभूत केले. नदाल हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे असे मत जोकोव्हिचनेही व्यक्त केले होते. नदालविरूद्धच्या जयपराजयाच्या आकडेवारीत जोकोव्हिच 27-25 असा आघाडीवर आहे. फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंत सेलेब्रिटींमध्ये किंग ऑफ क्ले नदाल 72 व्या स्थानावर आहे. त्याचे एकूण उत्पन्न 41.4 कोटी अमेरिकन डॉलर इतके आहे.  

टॅग्स :TennisटेनिसSportsक्रीडा