शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नदालचा विक्रमी ‘फ्रेंच किस’, बाराव्यांदा मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 09:33 IST

स्पेनच्या दिग्गज राफेल नदाल याने तुफानी खेळ करताना विक्रमी १२व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद उंचावले.

पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेवर आपलेच राज्य असते अशा तोऱ्यात खेळताना स्पेनच्या दिग्गज राफेल नदाल याने तुफानी खेळ करताना विक्रमी १२व्यांदा या स्पर्धेचे जेतेपद उंचावले. चार सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएम याचा ६-३, ५-७, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. नदालने यासह आपल्या कारकिर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम जिंकले.सामना चार सेटचा रंगला, मात्र नदालच्या धडाक्यापुढे तो सामना एकतर्फी झाला. पहिला सेट गमावल्यानंतर थिएमने दुसरा सेट जिंकून सामन्यात रंग भरले. यावेळी थिएम ऐतिहासिक कामगिरी करणार असे दिसत होते. मात्र नदालने आपणच ‘फ्रेंच’ किंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करताना सलग दोन सेट मोठ्या फरकाने अगदी सहजपणे जिंकत थेट सामनाच जिंकला. तिस-या व चौथ्या सेटमध्ये नदालच्या वेगवान व आक्रमक खेळापुढे थिएमला आपला खेळ करताच आला नाही. यासह एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे तब्बल १२वेळा जेतेपद पटकावणारा नदाल टेनिसविश्वातील एकमेवळ खेळाडू ठरला. त्याचबरोबर सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या शर्यतीत नदाल आघाडीवर असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररहून केवळ २ जेतेपदांनी मागे राहिला आहे. फेडररने सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.विशेष म्हणजे यासह मागील १० विजेतेपदांवर नदाल, फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांनीच कब्जा केला असल्याने टेनिसविश्वात याच ‘बिग थ्री’चे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. संपूर्ण सामन्यात केवळा दुसरा सेट अटीतटीचा रंगला. दोघांनीही आपापल्या सर्विस राखल्याने हा सेट टायब्रेकमध्ये गेला. येथे केलेली माफक चूक थिएमसाठी फायदेशीर ठरली आणि त्याने सामन्यात बरोबरी साधली. मात्र यानंतर नदालने जबरदस्त खेळ करताना थिएमला आव्हानही निर्माण करू दिले नाही.>सलग चार दिवस खेळून गाठली अंतिम फेरीडॉमनिक थिएमने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना सलग चार दिवस खेळल्यानंतर अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळेच त्याचा थकवा अखेरच्या दोन सेटमध्ये स्पष्टपणे दिसला. चौथ्या सेटच्या पहिल्या आणि तिसऱ्या गेममध्ये थिएमने ब्रेक पॉइंटची संधी मिळवली होती. पण त्यात तो अपयशी ठरला.

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालTennisटेनिस