शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

राफेल नदाल एटीपी फायनल्समधून बाद, पुन्हा एकदा जेतेपदाचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 05:43 IST

Rafael Nadal : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने २२ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावून टेनिसविश्वात अढळ स्थान प्राप्त केले. मात्र, त्याला कारकिर्दीत कधीही एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकला आली नाही.

तूरिन (इटली) : स्पेनचा दिग्गज टेनिसपटूराफेल नदाल याने २२ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावून टेनिसविश्वात अढळ स्थान प्राप्त केले. मात्र, त्याला कारकिर्दीत कधीही एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकला आली नाही. नदालचे हे स्वप्न यंदाही अपूर्णच राहिले आहे. सलग दोन पराभव पत्करावे लागल्यानंतर राफेलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.अव्वल मानांकित नदालला मंगळवारी या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत असलेल्या फेलिक्स एगर एलियासिमे याने ६-३, ६-४ असे नमवले. याआधी, अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झ यानेही नदालला ७-६(७-३), ६-१ असा धक्का दिला होता. सलग दोन पराभवांनंतर नदालची वाटचाल बिकट झाल्यानंतर बुधवारी नॉर्वेच्या तिसऱ्या मानांकित कॅस्पर रुडने फ्रिट्झचा ६-३, ४-६, ७-६(८-६) असा पराभव केला. यासह नदालचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. 

मी टेनिस खेळणे किंवा मानसिकरीत्या मजबूत होणे विसरलोय, असे मला वाटत नाही. मला सर्व सकारात्मक गोष्टींचे स्मरण करून दमदारपणे पुनरागमन करावे लागेल.- राफेल नदालदहावेळा सहभाग, यश एकदाही नाही या धक्कादायक निकालानंतर यंदाच्या वर्षाच्या अखेरीस एटीपी क्रमवारीत स्पेनच्याच कार्लोस अल्कारेझचे अव्वल स्थान कायम राहणार असल्याचेही स्पष्ट झाले. नदालने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा सलग चार पराभव पत्करले आहेत. यंदाच्या सत्राच्या सुरुवातीला नदालने ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम जिंकत विश्वविक्रमी कामगिरी केली होती. मात्र, यानंतर त्याला दुखापतीमुळे विम्बल्डनमधून माघार घ्यावी लागली होती. नदालने आतापर्यंत एटीपी फायनल्समध्ये दहा वेळा सहभाग घेतला असून, त्याला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. २०१० आणि २०१३ मध्ये नदालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालTennisटेनिस