शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्पेनच्या राफेल नदालची यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 11:03 IST

यूएस ओपन 2017 : स्पेनच्या राफेल नदालचा अंतिम फेरीत प्रवेश

ललित झांबरे/न्यूयॉर्क, दि. 9 - स्पेनच्या आग्रमानांकित राफेल नदालने धडाकेबाज विजयासह यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत राफेलने अर्जेंटिनाच्या 24 व्या मानांकित युआन मार्टिन डेल पोत्रोवर 4-6, 6-0, 6-3, 6-2 असा विजय मिळवला. यूएस ओपन विजेतेपदासाठी आता रविवारी नदालचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनशी होणार आहे.

डेल पोत्रोनं उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला मात दिली होती आणि यापूर्वी 2009 मध्येही त्याने नदाल व फेडरर यांना लागोपाठच्या सामन्यात हरवून यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे या लढतीत डेल पोत्रोकडून जबरदस्त संघर्षाची अपेक्षा होती. परंतु राफेल नदालने पहिला सेट वगळता त्याला संधीच दिली नाही आणि2009 मधील उपांत्य फेरीतील पराभवाचे पुरेपूर उट्टे काढले. डेल पोत्रोनं पहिला सेट 50 मिनिटांत 6-4 असा जिंकला,  परंतु त्यानंतर नदालने विलक्षण मुसंडी मारत पिछाडीवरुन आघाडी मिळत विजयाला गवसणी घातली.  दुसऱ्या सेटमध्ये तर अवघ्या  27 मिनिटांत त्याने डेल पोत्रोचा 6-0 असा धुव्वा उडवला. या सेटमध्ये त्याने लागोपाठ तीनवेळा डेल पोत्रोची सर्विस भेदली.

या धडाक्यानंतर तिसरा सेट 43 मिनिटे रंगला परंतु यातही दुसऱ्या गेममध्ये मिळालेल्या ब्रेकने नदालला वरचष्मा मिळवून दिला जो त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवला. नदालने अर्ध्या तासात गुंडाळलेल्या चौथ्या सेटमध्ये दोन वेळा  ब्रेकसह 4-1 अशी आघाडी घेतली तेव्हाच त्याचा विजय निश्चित झाला होता. नंतर हाताशी दोन मॅच पॉईंट असताना त्याने डाऊन द लाईन बॅकहँड विनर लगावून विजयावर शिक्कामोर्तब केले. नदालने यापूर्वी 2010 व 2013 मध्ये ही स्पर्धा जिंकली असून यंदा ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन पाठोपाठ तो तिसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. राफाने ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही 23वी वेळ आहे.