शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजनेश गुणेश्वरचे आव्हान संपुष्टात; बोपन्नाही पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 04:25 IST

प्रजनेश गुणेश्वरनची इंडियन वेल्समधील शानदार वाटचाल इवो कार्लोविचविरुद्ध पराभूत झाल्यामुळे खंडित झाली.

इंडियन वेल्स : प्रजनेश गुणेश्वरनची इंडियन वेल्समधील शानदार वाटचाल इवो कार्लोविचविरुद्ध पराभूत झाल्यामुळे खंडित झाली. भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेशनला क्रोएशियन खेळाडूविरुद्ध ३-६, ६-७ (४-७) ने पराभव स्वीकारावा लागला. ही लढत एक तास १३ मिनिटे रंगली.पहिला सेट एकतर्फी झाल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये प्रजनेशने जबरदस्त झुंज देताना कार्लोविचला चांगली लढत दिली. यावेळी सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर मोक्याच्यावेळी प्रजनेशने केलेली माफक चूक निर्णायक ठरली. याचा अचूक फायदा उचलत कार्लोविचने बाजी मारत पुढच्या फेरीत प्रवेश केला.जागतिक क्रमवारीत ९७ व्या स्थानावर असलेला प्रजनेश म्हणाला,‘त्याची भेदक सर्व्हिस परतविणे सोपे नव्हते. माझ्याकडे काही संधी होत्या, पण त्याचा लाभ घेण्यात मी अपयशी ठरलो. त्याचा प्रभाव सामन्याच्या निकालावर झाला.’ प्रजनेश प्रथमच एटीपी मास्टर्स स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यात त्याने चमकदार कामगिरी करीत ६१ गुण मिळविले. याचा त्याला जागतिक क्रमवारीत मोठा फायदा होणार असून तो आता कारकिर्दीमध्ये सर्वोत्तम ८२ व्या स्थानी येईल.दरम्यान, भारताचा रोहन बोपन्ना व त्याचा सहकारी डेनिस शापोवालोव यांना दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोव्हिच व फॅबियो फोगनिनी यांच्याविरुद्ध ६-४, १-६, ८-१० ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालासह बोपन्ना-शापोवालोव जोडीचे आव्हान संपुष्टात आले.जागतिक क्रमवारीत तिसरा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेवलाही गाशा गुंडाळावा लागला. नोव्हाक जोकोविचची तिसºया फेरीतील लढत पावसामुळे पूर्ण झाली नाही. जागतिक क्रमवारीत ५५ व्या स्थानी असलेल्या जॉन लनार्ड स्ट्रफने पाच सामन्यांत प्रथमच झ्वेरेवला ६-३, ६-१ असे नमवले. (वृत्तसंस्था)