शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नदालचे लक्ष ११ व्या फ्रेंच ओपन विजेतेपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:27 IST

स्पॅनिश स्टार राफेल नदाल याला ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावण्याची प्रबळ इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या कारकिर्दीचा अंत आता फार दूर नाही, असेही तो म्हणाला.

पॅरीस -  स्पॅनिश स्टार राफेल नदाल याला ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावण्याची प्रबळ इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या कारकिर्दीचा अंत आता फार दूर नाही, असेही तो म्हणाला.३२ वर्षांच्या खेळाडूने १६ मेजर विजेतेपद पटकावले आहे. तो आता आपल्या २४ व्या ग्रॅण्डस्लॅम फायनलमध्ये रोलंड गॅरोजवर डोमनिक थिएम विरोधात लढेल. त्यामुळे नदाल मारग्रेट कोर्टच्या सर्वकालिक विजेतेपदाची बरोबरी करेल. नदाल आता त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू रॉजर फेडररपेक्षा चार मेजर विजेतेपदांनी मागे आहे. फेडरर नदालपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे.राफेल नदाल याने उपांत्य फेरीच्या सामन्यात जुआन मार्टिन डेल पेट्रोला ६-४,६-१, ६-२ असे पराभूत केले. फ्रेंच ओपनमध्ये हा त्याचा ८५ वा विजय आहे. त्याला येथे केवळ दोनच वेळा पराभव पत्करावा लागला आहे.नदालला गुडघा आणि मनगटाच्या दुखापतीमुळे आठ ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धांमध्ये खेळता आले नाही. रविवारी आपले १७ वे ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्याच्या प्रेरणेने तो खेळणार आहे.अंतिम फेरीत आॅस्ट्रियाच्या २४ वर्षांच्या थिएमशी भिडेल. या दोघांमध्ये ९ वेळा सामने झाले आहेत. सर्वच सामने क्ले कोर्टवर झाले आहेत.डोमिनिक थिएम म्हणाला की,‘माझा सामना नदालसोबत होणार आहे. त्यामुळे माझ्यावर दबाव आहे.’येथे खेळणे हे माझ्यासाठी कायमच प्रेरणादायी राहिले आहे. मला वाटते की कारकिर्दीत मर्यादित संधी असतात. मी दुखापतींमुळे अनेक संधी गमावल्या आहेत. त्यामुळे माझ्याकडे दहापेक्षा जास्त संधी नाही. - राफेल नदालअखेर सिमोना ग्रॅण्ड स्लॅम जिंकलीपॅरीस : स्लॅमलेस नंबर वन अशी हिणवली जाणाऱ्या रुमानियाच्या सिमोना हालेप हिने अखेर ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर तिने शनिवारी आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात सिमोनाने अमेरिकेच्या स्लोएन्स स्टिफन्सवर तीन सेटमध्ये ३-६,६-४,६-१ असा विजय मिळवला.तिसºया सेटपर्यंत संघर्षमय झालेल्या या सामन्यात निर्णायक सेटमध्ये मात्र सिमोनाने ५ -० अशी मुसंडी मारली होती. त्यानंतर स्टिफन्सने १ गेम जिंकत पराभव लांबवला. मात्र जबरदस्त फॉर्मममध्ये असलेल्या नंबर वन सिमोनाला ती रोखू शकली नाही. सिमोनाने या आधी या स्पर्धेची तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. आणि गेल्या दोन वेळची ती उपविजेती होती.दोन तास तीन मिनिटे चालेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये स्टिफन्सने वर्चस्व गाजवले. तिने पहिला सेट फक्त ४१ मिनिटात जिंकला. आणि दुसºया सेटमध्ये चौथ्या ब्रेकपॉईंटवर पहिला गेम जिंकला त्या वेळी असे वाटले होते की, हालेप पुन्हा एकदा ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पराभूत होईल.हालेपने त्यानंतर १३ पैकी १२ गुण घेत सामना पालटला. दुसरीकडे अमेरिकन ओपन विजेती स्टिफन्स फोरहॅण्डवर चुका करत होती. सिमोना हालेपने दुसरा सेट जिंकून सामना निर्णायक सेटपर्यंत खेचला. तिसºया सेटमध्ये स्टिफन्स सुुरुवातीपासूनच दबावात होती. आणि ती पुनरागमन करू शकली नाही. या सेटवर सिमोनाने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. एक वर्ष आधी येलेना ओस्टापेनाकोने सिमोना हालेपवर फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला होता.मला दिलेल्या पाठिंब्याबात सर्वांचेच आभार, अखेरच्या गेममध्ये मी श्वास देखील घेऊ शकत नव्हते. मागच्या वर्षी झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती मला यंदा होऊ द्यायची नव्हती. मी टेनिस खेळायला लागल्यापासूनचे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाले आहे. माझा विश्वास बसत नाही. - सिमोना हालेप

टॅग्स :Sportsक्रीडाnewsबातम्या