मियामी - जॉन इस्नरने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत जर्मनीच्या अलेक्सांद्र झ्वेरेवचा ६-७ (४/७), ६-४, ६-४ ने पराभव करीत प्रथमच मियामी ओपन टेनिस स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. इस्नरला यापूर्वी तीनवेळा टूर फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. पण झ्वेरेवविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करताना शानदार विजय मिळवला.क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या या खेळाडूचे कारकिर्दीतील १३ वे जेतेपद आहे. त्यामुळे जागतिक क्रमवारीत ८ स्थानांची प्रगती करताना त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ९ वे स्थान पटकावले आहे. पराभवानंतरही झ्वेरेवला एका स्थानाचा लाभ झाला असून, तो चौथ्या स्थानी दाखल झाला आहे. (वृत्तसंस्था)
मियामी ओपन; जॉन इस्नर अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 02:23 IST