शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Miami Open: मियामी मास्टर्समधून फेडरर, हालेप बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:57 AM

स्वित्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली सिमोना हालेप यांना मियामी

मियामी : स्वित्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली सिमोना हालेप यांना मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसºया फेरीत पराभवाचा धक्का बसला. आॅस्ट्रेलियाच्या थानासी कोकिनाकिस याने फेडरला, तर पोलंडच्या एग्निस्का रादवांस्काने हालेपला पराभूत केले. या पराभवामुळे फेडररला जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानही गमवावे लागले.जागतिक क्रमवारीत १७५ व्या स्थानी असलेल्या कोकिनाकिस याने २० वेळा ग्रॅँड स्लॅम विजेत्या फेडररला ३-६, ६-३, ७-६ असे पराभूत केले. फेडररने फेब्रुवारी महिन्यात आॅस्ट्रेलियन ओपन जिंकत रॅँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकाविले होते. मात्र, हे स्थान कायम राखण्यासाठी मियामी मास्टर्स स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणे गरजेचे होते. ही स्पर्धा संपेल तेव्हा स्पेनच्या राफेल नदालने अव्वल स्थान पटकाविले असेल.महिलांच्या सामन्यातही आज खळबळजनक निकाल पाहण्यास मिळाला. जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या हालेफला रादवांस्काने ३-६, ६-२, ६-३ असे पराभूत केले. रादवांस्काची पुढील लढत व्हिक्टोरिया अजारेंकाशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या आजरेंकाने लॅटिव्हियाच्या अनास्तासिया सेवास्तोवाला ३-६, ६-४, ६-१ असे पराभूत केले. अन्य एका सामन्यात कॅरोलिना प्लिस्कोव्हाने तैवानच्या सिए सु वेई हिला ६-४, १-६, ७-६ असे पराभूत केले. सामन्यानंतर कोकिनाकिस म्हणाला, ‘मी शांत होतो, मात्र आतून खूप उत्साहित व आनंदी होतो; मात्र मी संयम राखला.’ फेडरर म्हणाला, ‘अशा सामन्यानंतर नेहमीच मला वाईट वाटते. अशा प्रकारचे सामने कधीतरीच होतात. अशा सामन्यासाठी काही उपाय शोधावा लागतो; मात्र आज मी काही करूशकलो नाही.’ कोकिनाकिसची लढत आता फर्नांडो वर्डास्को याच्याशी होणार आहे. फर्नांडोने गुलीरेमो गार्सिया लोपेज याला ४-६, ६-०, ६-२ असे पराभूत केले. अन्य एका सामन्यात चेक गणराज्यच्या १० व्या मानांकित थॉमस बर्डीच याने जपानच्या योशिहितो निशियोका याला ६-१, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.आपल्या २१व्या ग्रॅँडस्लॅमच्या तयारीसाठी रॉजर फेडररने फ्रेंच ओपनमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सलग दुसºया वर्षी फेडरर क्ले कोर्टवर खेळताना दिसणार नाही. मियामी मास्टर्सच्या दुसºया फेरीत कोकिनाकिसकडून पराभूत झाल्यानंतर फेडररने याची माहिती दिली. फेडरर म्हणाला, ‘मी क्ले कोर्टवर न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.’ फेडररने मागील वर्षी इंडियन वेल्स व मियामी स्पर्धा जिंकल्यानंतर विश्रांती घेतली होती. त्यानंतर त्याने स्टुटगार्डमधील स्पर्धेत सहभाग घेलला होता. त्यानंतर त्याने विम्बल्डनचे जेतेपद पटकाविले होते.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडरर