पुणे : क्रोएशियाच्या मरीन चिलीच याने महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे . जागतिक क्र.७ असलेल्या चिलीचने आपल्या सोशल मिडियावरून हे जाहीर केले आहे.यावेळी मरीन चिलीच म्हणाला कि, महाराष्ट्र स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्यामुळे मला दु:ख झाले आहे. संयोजक आणि माझ्या चाहत्यांची मी मनापासून माफी मागत आहे. गुडघ्यावरील दुखापतीपासून मी सावरतच होतो आणि या मौसमाची शेवटाला ही दुखापत आणखी वाढू लागली. आॅफ सीजन दरम्यानच्या उपचाराची नक्कीच मदत होणार आहे. परंतु या स्पर्धेत सहभागी जरी झालो तरी सध्या मी१००टक्के योगदान देऊ शकत नाही. भारतात बरेच वर्षे नवे साजरे करत असून या वर्षी मला ते साजरे करता येणार नाही. परंतु पुढच्या वर्षी मी नक्की साजरे करेन, अशी आशा आहे.मायनेनी, मुकुंद आज लढणारपात्रता फेरीच्या शनिवारी होणाऱ्या लढतींमध्ये वाईल्ड कार्ड धारक भारताचा एस.मुकुंद इटलीचा जी.क्यींजी आणि साकेत माननेनी चायनीज तैपईच्या जे.ज्युंग विरूद्घ खेळणार आहेत.
मरीन चिलीचची महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतून माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 01:27 IST