शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही सेटमध्ये पिछाडीवरून मारियाचा जबरदस्त विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:11 IST

रशियाच्या मारिया शारापोव्हाने तिआनजीन ओपन स्पर्धा जिंकताना महिला टेनिसच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय विजयांपैकी एक विजय नोंदवला. पहिल्या सेटमध्ये १-४ आणि दुस-या सेटमध्ये १-५ अशी मागे पडल्यावर, एवढेच नाही तर तब्बल तीन मॅच पॉर्इंट गमावल्यावर अखेर चौथ्या मॅच पॉर्इंटवर तिने अंतिम सामना जिंकला.

तिआनजीन : रशियाच्या मारिया शारापोव्हाने तिआनजीन ओपन स्पर्धा जिंकताना महिला टेनिसच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय विजयांपैकी एक विजय नोंदवला. पहिल्या सेटमध्ये १-४ आणि दुस-या सेटमध्ये १-५ अशी मागे पडल्यावर, एवढेच नाही तर तब्बल तीन मॅच पॉर्इंट गमावल्यावर अखेर चौथ्या मॅच पॉर्इंटवर तिने अंतिम सामना जिंकला. बेलारुसच्या एरिना साबालेंकाचा कडवा संघर्ष दोन तास पाच मिनिटात तिने ७-५,७-६ (१०-८) असा मोडून काढला. एवढी कलाटणी महिला टेनिस इतिहासात क्वचितच कुणी अंतिम फेरीच्या सामन्याला दिली असेल. डोपिंगनंतर पुन्हा खेळायला लागल्यापासून मारियाचे हे पहिलेच विजेतेपद आहे.या नाट्यमय सामन्यात माजी नंबर वन आणि पाच ग्रँड स्लम स्पर्धा विजेत्या मारियाने तरुण एरिना सबालेंका हिच्यावर ७-५, ७-६ (१०-८) असा विजय मिळवला. अर्थात मारियासारख्या कसलेल्या खेळाडूला एवढी टक्कर देणाºया एरिनाचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जागतिक क्रमवारीत १०२ व्या स्थानी असलेल्या एरिनाने संपूर्ण सामन्यात मारियाला एक क्षणसुद्धा निवांत बसू दिले नाही. १९ वर्षीय एरिना प्रथमच डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली होती.२०१५च्या इटालियन ओपननंतरचे मारियाचे हे पहिलेच, तर एकूण ३६ वे अजिंक्यपद आहे. तब्बल अडीच वर्षांनंतर तिने एखादी स्पर्धा जिंकली आहे. यंदा एप्रिलमधील पुनरागमनानंतर सातव्या स्पर्धेत प्रथमच तिच्या हाती विजेतेपदाची ट्रॉफी आली आहे.बेलारुसच्या एरिनासोबतच्या या भन्नाट सामन्यात ११ सर्व्हिस ब्रेक बघायला मिळाले.या सामन्याच्या पहिल्या सेटमधील सातवा गेम तब्बल नऊ मिनिटे रंगला. १-४ अशी मागे पडल्यावर प्रशिक्षकाच्या सल्ल्याने बॉडी सर्व्ह तंत्र वापरणा-या मारियाने हा गेम जिंकला आणि एरिनाची सर्व्हिस भेदली. त्यानंतर संतापलेल्या एरिनाने तिसºयांदा सर्व्हिस गमावली. दुसºया सेटमध्येही १-५ पिछाडीवरून मारियाने तीन ब्रेक मिळवत मुसंडी मारली. या विजेतेपदामुळे मारिया शारापोव्हा जागतिक क्रमवारीत ८६ व्या स्थानावरून ५७ व्या स्थानी झेपावणार आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा