शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माद्रिद ओपन टेनिस : राफेल नदालची विजयी आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 04:02 IST

‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली.

माद्रिद - ‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली. त्याने कॅनडाचा युवा टेनिसपटू फेलिक्स आॅगर एलियासिमे याचा पराभव केला. त्याचवेळी, नदालचाच देशबांधव डेव्हिड फेरर याने पराभवानंतर निवृत्ती घेतली.नदालने फेलिक्सविरुद्ध ६-३, ६-३ असा धडाकेबाज विजय मिळवत दिमाखात सुरुवात केली आहे. पुढील फेरीत नदाल अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफोविरुद्ध लढेल.दुसरीकडे, जागतिक टेनिसमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या डेव्हिड फेररने पराभवाचा सामना केल्यानंतर टेनिसविश्वातून निवृत्ती घेतली. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याने एकतर्फी सामन्यात वर्चस्व राखताना फेररचा ६-४, ६-१ असा पराभव केला. सामना संपल्यानंतर फेररने पत्नी मार्टा टॉर्नेल आणि मुलाच्या उपस्थितीमध्ये प्रेक्षकांना अभिवादन केले. या भावनिक क्षणी फेररला अश्रू अनावर झाले. तसेच नदाल, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या दिग्गजांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंनी फेररला मानवंदनाही दिली.स्पर्धेच्या तिसºया फेरीत स्वित्झर्लंडचा स्टॅन वावरिंका आणि जपानचा केई निशिकोरी यांच्यातील लढतीकडे टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे. निशिकोरीने बोलिवियाच्या हुगो डेलिन याचा ७-५, ७-५ असा पाडाव केला. दुसरीकडे, वावरिंकाने अर्जेंटिनाच्या गुईडो पेला याचा ६-३, ६-४ असा धुव्वाउडवला. (वृत्तसंस्था)या स्पर्धेत सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने खेळत असलेल्या नदालला गेल्या महिन्यात माँटे कार्लो आणि बार्सिलोना ओपन स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर तोकाहीवेळ पोटाच्याआजाराने त्रस्त झाला.

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालTennisटेनिस