शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लावेर कप टेनिस : टीम युरोपने मारली बाजी, दिग्गज रॉजर फेडररचा निर्णायक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:58 IST

जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने सुपर टायब्रेकपर्यंत रंगलेल्या सामन्यात निक किर्गियोसला नमवून युरोप संघाला लावेर कप मिळवून दिला.

प्राग : जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने सुपर टायब्रेकपर्यंत रंगलेल्या सामन्यात निक किर्गियोसला नमवून युरोप संघाला लावेर कप मिळवून दिला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात फेडररने आपला सर्व अनुभव पणास लावताना किर्गियोसची झुंज मोडून काढली. युरोपने या लढतीवर एकहाती वर्चस्व राखताना विश्व संघाचा १५-९ असा पराभव केला.यंदाच्या वर्षी आॅस्टेÑलियन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकलेल्या फेडररने पुन्हा एकदा आपल्या उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करताना टेनिसप्रेमींचे मन जिंकले. किर्गियोसविरुद्ध पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतरही फेडररने आपले नियंत्रण न गमावताना ४-६, ७-६, ११-९ असा रोमांचक विजय मिळवत यूरोप संघाला विजयी केले. त्याचवेळी, जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानी असलेल्या २२ वर्षीय किर्गियोसने अप्रतिम झुंज देताना १९ ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररला घाम गाळायला लावले.सामन्याच्या अखेरच्या तिसºया दिवसाची युरोप संघाने ९-३ अशा आघाडीने सुरुवात केली. अंतिम दिवशी झालेल्या दुहेरी सामन्यात विश्व संघाच्या जॅक सोक - जॉन इसनर या जोडीने शानदार बाजी मारताना युरोप संघाच्या थॉमस बर्डिच - मारिन सिलिच या जोडीचा ७-६, ७-६ असा पाडाव केला. यासह विश्व संघाने आपली पिछाडी ६-९ अशी कमी करताना जेतेपदाच्या आशा कायम राखल्या.यानंतरच्या एकेरी सामन्यात अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवने विजय मिळवताना विश्व संघाच्या सॅम क्वेरीचे आव्हान सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-४ असे परतावले. या जोरावर युरोप संघाचे जेतेपद जवळपास निश्चित झाले होते. परंतु, राफेल नदालच्या अनपेक्षित पराभवाने पुन्हा एकदा विश्व संघाने आपल्या जेतेपदाच्या आशा उंचावताना सामना अखेरच्या लढतीपर्यंत खेचला. मात्र, फेडररने विश्व संघाचे स्वप्न धुळीस मिळवले. (वृत्तसंस्था)इस्नरने आशा उंचावल्या पण...जॉन इसनर याने दुहेरीतील चमकदार कामगिरीनंतर विश्व संघाला पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत आणताना जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू राफेल नदालला ७-५, ७-६ असा धक्का दिला.राफाच्या या अनपेक्षित पराभवानंतर विश्व संघाने ९-१२ अशी भरपाई केली. यामुळे, किर्गियोस फेडररला धक्का देण्यात यशस्वी ठरला असता, तर विश्व संघाने युरोप संघाशी बरोबरी केली असती.मात्र, फेडररला ते मान्य नव्हते आणि त्याने अखेरपर्यंत लढताना झुंजार खेळाचे प्रदर्शन करुन युरोप संघाला पहिले लावेर विजेतेपद जिंकून दिले.निर्णायक सामन्यात फेडरर किर्गियोसविरुध्द सुरुवातीला अडखळला. पहिल्या सेटमध्ये झालेल्या माफक चुकांचा त्याला फटका बसला.दमदार पुनरागमन करत फेडने किर्गियोसला दाबावाखाली आणत बाजी मारली.

टॅग्स :Sportsक्रीडा