शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

Aishwarya Jadhav, Wimbledon 2022 : अखेरच्या सामन्यात ऐश्वर्याची टायब्रेकरपर्यंत झुंज; न्यूझीलंडच्या ऐशी दॅस कडून पराभूत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2022 10:18 PM

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिचा चौदा वर्षांखालील ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धेत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यांत न्यूझीलंडच्या ऐशी दॅस हिच्याकडून ३-६, ६-२, ५-१० असा पराभव झाला.

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिचा चौदा वर्षांखालील ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धेत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यांत न्यूझीलंडच्या ऐशी दॅस हिच्याकडून ३-६, ६-२, ५-१० असा पराभव झाला. मात्र, तिने अखेरचा सेट टायब्रेकरपर्यंत नेला. तिची कडवी झुंज उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.विम्बल्डन नगरीतील ऑल इंग्लंड क्लबच्या मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी उशिरा रात्री झालेल्या दुसऱ्या सामन्यांत ग्रेट ब्रिटनच्या मिका स्वालेवीक हिच्यासोबत झालेल्या सामन्यात ती ६-४, ६-१ अशी सरळ सेटमध्ये हरली, तर शुक्रवारी सकाळी झालेल्या तिसऱ्या सामन्यांत तिने न्यूझीलंडच्या ऐशी दॅस हिला विजयासाठी चांगलेच झुंजविले. या सामन्यात पहिला सेट ऐश्वर्या हरली.

त्यानंतर तिने पुनरागमन करीत दुसऱ्या सेटमध्ये ६-२ अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींचेही ५-५ असे समान गुण झाले. त्यामुळे टेनिसमधील नव्या नियमानुसार सामना टाय झाला. तिसऱ्या सेटसाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यात अखेरच्या क्षणी प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या ऐशी दॅस हिने जोरदार फटकेबाजी करीत हा सामना ५-१० असा जिंकला. सलग तीन पराभवामुळे ऐश्वर्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता तिचे पुढील लक्ष्य फ्रान्स व जर्मनी येथे होणाऱ्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा कार्यक्रमावर आहे. येत्या दोन दिवसांत ती भारतात परतणार असून पुन्हा १७ जुलैला ती फ्रान्स स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. तिला या कार्यक्रमांतर्गत पाच आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, विम्बल्डन स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे तीन सामने खेळता आले नाहीत. उर्वरित दोन सामने ती आता खेळणार आहे.

मी पुन्हा येईनटेनिस पंढरी विम्बल्डनमध्ये प्रथमच मला संधी मिळाली. ग्रासकोर्टवर खेळण्याचा अनुभव मला नव्हता. तरीसुद्धा मी अखेरच्या सामन्यात या स्पर्धेत कसे खेळायचे हे मला समजले. अखेरच्या सामन्यात बरोबरीनंतर ९-३ अशी स्थिती होती. मी त्यात ९-५ पर्यंत चांगली कामगिरी केली. माझी कामगिरी माझ्या दृष्टीने सरस झाली. पुढील वेळेस विम्बल्डननगरीत मी पुन्हा येईन आणि चांगला खेळ करून दाखवीन, अशी प्रतिक्रिया ऐश्वर्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनkolhapurकोल्हापूरTennisटेनिस