शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इनडोअरमुळे होणार रोमहर्षक सामने, भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली होईल - झीशान अली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:49 IST

एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास खेळाडूंना होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास खेळाडूंना होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.झीशान म्हणाले, ‘या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली असेल. भारताच्या युकी भांबरीला इनडोअरमध्ये खेळणे आवडते. मागील वेळी आम्ही न्यूझीलंडविरुद्ध खूपच चांगली कामगिरी केली होती. इनडोअरमुळे आमचे काही नुकसान होईल, असे मला वाटत नाही, त्याचबरोबर त्यांनाही याचा खास फायदा होणार नाही.’या स्पर्धेत भारताला कॅनडाच्या डेनिस शापोवलोव व दुहेरीतील तज्ज्ञ खेळाडू डेनियल नेस्टर यांचे कडवे आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेला मिलोस राओनिच दुखापतीमुळे या लढतीला मुकणार आहे. झीशान म्हणाले, ‘शापोवलोव खूपच चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्याच्याविरुद्धची लढत ही सोपी असणार नाही. तरीही आम्हाला चार वर्षांत ही सर्वांत चांगली संधी आहे.’माजी कर्णधार एस. पी. मिश्रा यांनीही भारताला यावर्षी मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. सोमदेव देवबर्मन याच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करीत आपले पद सोडणा-या मिश्रा यांना आपल्या अनुपस्थितीत संघ एकदाही प्ले आॅफच्या पुढे गेला नाही याचे आश्चर्य वाटते.ते म्हणाले, ‘मी २०१० व २०११ मध्ये भारताला जागतिक गटात नेले होते; मात्र त्या वेळीही भारताने अपेक्षित कामगिरी केली नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता कोणी तर या संघाला जागतिक गटात न्यायला हवे.’ मिश्रा म्हणाले, ‘मागील काही वर्षांच्या तुलनेत आपल्याकडे चांगले खेळाडू नाहीत. कॅनडाकडे चांगल्या रॅँकिंगचे खेळाडू आहेत.मात्र, आपली तयारी यावेळी चांगली झाली असल्याचे त्यांनी सांगितले. युकी भांबरी व रामकुमार सध्या चांगली कामगिरी करीत आहेत, तर रोहनने यापूर्वी नेस्टरला पराभूत केले होते. साकेतही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने या वेळी रोमहर्षक सामने होतील.’झीशान म्हणाले, ‘इनडोअर स्टेडियममध्ये खेळताना बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा परिणाम आपल्या खेळावर होत नाही. त्यामुळे आपल्या खेळाचा स्तर सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढतो.’ भारताकडे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जागतिक गटात स्थान पटकाविण्याची आता मोठी संधी आहे, असे झीशान यांना वाटते. भारताला मागील तीन वर्षांत सर्बिया, झेक गणराज्य व स्पेनकडून पराभव पत्करावा लागला होता.

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत