शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन वेल्स एटीपी: रॉजर फेडरर, राफेल नदाल सुसाट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 03:56 IST

जोकोविच, ओसाका यांचे आव्हान संपुष्टात

इंडियन वेल्स (अमेरिका) : स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स स्पर्धेत आगेकूच करताना आपल्याच देशाच्या स्टॅनिसलास वावरिंकाला पराभूत केले. यासह त्याने स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली. स्पेनचा स्टार राफेल नदालनेही विजयी घोडदौड करताना चौथी फेरी गाठली. त्याचवेळी, नोव्हाक जोकोविच व नाओमी ओसाका या जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडूंचा तिसऱ्या फेरीतच पराभव झाला.फेडररने देशबांधव वावरिंकाविरुद्धचे आपले वर्चस्व सिद्ध करताना विजयाचा रेकॉर्ड २२-३ असा केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात फेडररने आक्रमक खेळ करीत ६-३, ६-४ असा दिमाखदार विजय मिळवला. यासह फेडररने या स्पर्धेचे विक्रमी सहावे जेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. पुढील फेरीत त्याचा सामना ब्रिटनच्या कायले एडमंडविरुद्ध होईल.त्याचवेळी, पावसामुळे सोमवारी थांबविण्यात आलेल्या सामन्यात मंगळवारी जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबरने सनसनाटी निकाल नोंदवत जोकोविचला ६-४, ६-४ असे नमविले. बिगरमानांकीत फिलिपने अप्रतिम नियंत्रण राखताना कसलेल्या जोकोविचला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. त्याच्या जोरदार फटक्यांपुढे जोको पूर्णपणे हतबल झाला.त्याचप्रमाणे महिलांमध्येही अनपेक्षित निकालाची नोंद झाली. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचनेदेखील सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिचे आव्हान ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले. गेल्यावर्षी ओसाकाने या स्पर्धेचे जेतेपद उंचावले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालRoger fedrerरॉजर फेडरर