शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

४३ हे वय नव्हे, ती ‘माझी लेव्हल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 10:38 IST

Rohan Bopanna: कोमट यश हे अपयशापेक्षा वाईट असतं आणि त्याच्या वाट्याला तर कायम कोमटच यश आलं. त्यापेक्षा खणखणीत अपयश कदाचित त्यानं जास्त मानानं मिरवलं असतं; पण ना धड लखलखीत यश, ना आदळून तोडूनफोडून टाकणारं अपयश.

- अनन्या भारद्वाज (मुक्त पत्रकार)कोमट यश हे अपयशापेक्षा वाईट असतं आणि त्याच्या वाट्याला तर कायम कोमटच यश आलं. त्यापेक्षा खणखणीत अपयश कदाचित त्यानं जास्त मानानं मिरवलं असतं; पण ना धड लखलखीत यश, ना आदळून तोडूनफोडून टाकणारं अपयश. मिळालं ते क्रमांक दोनचं गुळमुळीतच यश. चार वर्षांपूर्वी तर त्यालाही वाटलं होतं, संपलो आपण. अर्थात त्याला वाटो, ना वाटो, ‘तो’ संपला असल्याची खात्री जगात अनेकांना होती.

त्याला मात्र हवंच होतं निरोपापूर्वी तरी यशाचं शिखर; पण शरीराचं काय करणार? ते थकायला लागलं, वयाची चाळीशी उलटली, चेहऱ्यावरची दाढीची खुंटं पांढरी झाली... आणि दोन दशक सतत खेळल्यानं थकलेलं शरीरही म्हणत होतं, आता बास! आणि नेमका जगभरात अनेकांच्या वाट्याला आला तसा त्याच्याही वाट्याला कोरोना आला. घरात बसणं भाग होतं. तेव्हा त्याला एक योगप्रशिक्षक सापडला. आठवड्यातून चार दिवस ९० मिनिटं तो नेमानं योगाभ्यास करू लागला. त्याच्या शरीराची ताकद तर वाढलीच; पण स्वत:चा हरवलेला सूर त्याला सापडायला लागला. मनाचं भिरभिरं शांत व्हायला लागलं आणि ‘फोकस’ वाढला. 

च महिन्यांत एकही सामना न जिंकलेला तो ऑस्ट्रेलियन डबल्ससाठी कोर्टवर उतरला तेव्हा (टेनिसच्या दृष्टीने) हा म्हातारा जिंकेल यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. पण तो जिंकला! वयाच्या ४३व्या वर्षी टेनिसच्या इतिहासातला सर्वाधिक वयस्क असलेला खेळाडू म्हणून जिंकला, ‘ओल्डेस्ट नंबर वन’ ठरला. त्यानंतरच्या भाषणात स्वत:ची प्रोसेस मांडताना तो जे सांगत होता ते विलक्षण आहे. तो म्हणाला, ‘वाट्याला जे जे येईल ते ते सोसत राहण्याची चिकाटी मला पुढे पुढे ढकलत राहिली. मलाही वाटत होतं की थांबावं; पण आत काहीतरी होतं, जे म्हणायचं, तू अजून जिंकलेला नाहीस! आपण आपलं ऐकावं, सांगता नाही येत आयुष्य कधी बदलेल, कधी जादू होईल आणि जगणं बदलून जाईल!’ जगणं असं बदलण्याची, कोमट यश कधीतरी खणखणीत यशात बदलेल याची वाट पाहत तो झुंजत राहिला. आणि शेवटी चॅम्पियन झालाच!म्हणून तर तो सांगतो, ४३ हे वय नाही.. माझी लेव्हल आहे!  आणि त्याचा चाळिशीतला पुनर्जन्मही.. रोहन बोपन्ना त्याचं नाव!

टॅग्स :Tennisटेनिस