शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

हालेपचा संघर्षपूर्ण विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 03:04 IST

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपला दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी संघर्ष करावा लागला.

पॅरीस : जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या सिमोना हालेपला दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी संघर्ष करावा लागला. पेट्रा क्विटोवाने लाला अरुआबारेनाला पराभूत करत तिसरी फेरी गाठली.हालेपने फ्रेंच ओपनचे २०१४ व २०१७ मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीत ८३ व्या स्थानी असलेल्या एलिसन रिस्कीने पहिला सेट २-६ असा घेतला. मात्र हालेपने आपला खेळ उंचावत २-६,६-१,६-१ अशा सेटने सामना जिंकला.हालेप म्हणाली, ‘ग्रॅँडस्लॅमची पहिली फेरी नेहमीच कठीण असते. सुरुवातीला मी थोडी निराश होते.’ हालेपचा पुढील सामना अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंड हिच्याशी होणार आहे. दरम्यान आठव्या मानांकित क्वितोवाने स्पेनच्या लारा अरुआबरेना हिला ६-०,६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दोन वेळा विम्बल्डन विजेती असलेल्या क्विटोवाने क्ले कोर्टवर सलग १३ सामने जिंकले आहेत.क्वितोवाने फ्रेंच ओपनपुर्वी प्राग व माद्रीद येथे झालेल्या स्पर्धेचेजेतेपद पटकावले आहे. तिलाअंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी एस्टोनियाच्या २५ व्या मानांकित एनेट कोंटाविटशी लढावे लागणार आहे.युक्रेनच्या चौथ्या मानांकित एलिना स्वेतलानाने अंतिम ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. एलिनाने स्लोव्हाकियाच्या व्हिक्टोरियाने कुजुमोवा हिला ६-३,६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. फ्रेंच ओपनमध्ये दोन वेळा उपांत्य फेरी गाठणारी स्वेतलानाचा सामना आता रोमानियाच्या मिहिला बुजारनेस्कूशी होणार आहे.जपानच्या २१ व्या मानांकित नाओमी ओसाकाने कजागिस्तानच्या झरीना डियासला ६-४,७-५ असे पराभूत करत पुढील फेरी गाठली. पुरुषांच्या गटात इटलीच्या मार्को सेसहिनातोने अर्जेंटिनाच्या मार्को टुंगेलिटीला ६-१,७-६,६-१ असे पराभूत करत तिसरी फेरी गाठली.केई निशीकोरीचा विजयजापानच्या केई निशीकोरी याने फ्रान्सच्या बेनॉट पेअर याच्यावर ६-३,२-६,४-६, ६-२,६-३ असा विजय मिळवत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची पुढची फेरी गाठली आहे. या विजयासह निशीकोरी याने अंतिम ३२ मध्ये स्थान मिळवले आहे. २१ वे रँकिंग असलेल्या निशीकोरीला ५१ वे रँकिंग असलेल्या पेअर याने चांगलेच झुंजवले. जापानचा हा खेळाडू पहिल्या तीन पैकी दोन सेटमध्ये पराभूत झाला होता. मात्र त्यानंतर त्याने आपला अनुभव पणाला लावत अखेरचे दोन सेट जिंकत पुढची फेरी गाठली.नोव्हाक जोकोविचने क्ले कोर्टवरील आपला दबदबा कायम राखला. त्याने ज्येईम मुनरचा ७-६,६-४,६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. तो म्हणाला,’ प्रेरणाच अशा कठीण स्पेलमध्ये विजयासाठी महत्वाची असते. जुलैमध्ये ईस्टबॉर्न येथे झालेलया एटीपी टेनिस टूरचे जेतेपद त्याने जिंकले . डी इटालिया या स्पर्धेत त्याने क्ले कोर्टचा राजा राफेल नदाल याला कडवी झुंज दिली होती.