शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018 : भारत 'सात वे आसमां पर'; मनिका बत्राचा 'गोल्डन स्मॅश', दिवसातील सातवं सुवर्णपदक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 16:30 IST

टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं 'गोल्डन स्मॅश' लगावला.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता दोन डझन सुवर्णपदकं जमा झाली आहेत. टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं 'गोल्डन स्मॅश' लगावला. त्याशिवाय, भारताच्या शिलेदारांनी आत्तापर्यंत १४ रौप्य आणि १७ कांस्यपदकांची कमाई केली आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा आजचा दहावा दिवस भारतासाठी 'सोनियाचा दिनु' ठरला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच देशाचं प्रतिनिधित्व करणारी विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम हिनं 'सोनेरी' ठोसा लगावला. त्यानंतर, पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटात गौरव सोळंकीनंही सोनेरी यश मिळवलं. नेमबाजीत संजीव राजपूतनं आणि भालाफेकीत नीरज चोप्रानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. कुस्तीतील सोनेरी कामगिरीची मालिका सुमित मलिकने पुढे सुरू ठेवली. तर, विनेश फोगाटनंही सुवर्णपदक पटकावलं. 

या सुवर्ण षटकारानंतर, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा भारताला 'सातवे आसमां पर' घेऊन गेली. पहिल्या गेममध्ये १-६ अशी पिछाडीवर पडलेल्या मनिकानं झुंजार पुनरागमन केलं आणि हा गेम ११-७ नं जिंकला. त्यानंतर तिचा आत्मविश्वास इतका उंचावला की, इंग्लंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला डोकं वर काढण्याची संधीच तिने दिली नाही. पुढचे तीनही गेम खिशात टाकत तिनं सुवर्णपदक जिंकलं.

 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८