शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

फ्रेंच ओपन : ज्वेरेवकडून कारेनला पराभवाचा धक्का; नोव्हाक, मार्कोचा पुढच्या फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 05:46 IST

जर्मनीचा द्वितीय मानांकित अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेव याने आज येथे फ्रेंच ओपनमध्ये जबरदस्त मुसंडी मारताना सलग तिसऱ्या विजयासह प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

पॅरिस : जर्मनीचा द्वितीय मानांकित अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेव याने आज येथे फ्रेंच ओपनमध्ये जबरदस्त मुसंडी मारताना सलग तिसऱ्या विजयासह प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला गटात अमेरिकेच्या १३ व्या मानांकित मेडिसन कीज हिनेही विजयी घोडदौड कायम ठेवली.पुरुष एकेरीत ज्वेरेव याने रशियाच्या कारेन खाचानोव याचा चौथ्या फेरीत ४-६, ७-६, २-६, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता त्याची लढत डोमिनिक थिएम याच्याविरुद्ध होईल. १९३७ नंतर फ्रेंच ओपन जिंकणारा जर्मनीचा पहिला खेळाडू ठरण्याची मनीषा बाळगणारा ज्वेरेव त्याच्या १२ व्या प्रयत्नात प्रथमच ग्रँडस्लॅमच्या अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. ज्वेरेवने याआधी स्पर्धेत दुसान लाजोविच आणि दामिर जुमहुर यांच्याविरुद्धही पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त मुसंडी मारत विजय नोंदवले होते. त्याने दोन ब्रेकपॉइंट वाचवल्यानंतर एक बिनतोड सर्व्हिस करीत सेट आपल्या नावावर केला. त्याने सामन्यादरम्यान ६३ विनर आणि १७ वेळेस बिनतोड सर्व्हिस केली.पुरुषांच्या एकेरीत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार सर्बियाच्या नोवाक जोकोविचने स्पेनच्या फर्नांडो वर्दास्कोचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-४, ६-२ असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला़ दुसरीकडे इटलीच्या मार्को सिंचिनाटोने डेव्हिड गॉफिनला ७-५, ४-६, ६-०, ६-३ असे नमविले़ महिला गटात अमेरिकेच्या १३ व्या मानांकित मेडिसन कीज हिने रोमानियाच्या मिहाएला बुजार्नेस्कू हिच्यावर ६-१, ६-४ अशी सरळ सेट्समध्ये मात करीत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गेल्या वर्षी अमेरिकन ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावणाºया कीजचा सामना आता झेक प्रजासत्ताकच्या २६ व्या मानांकित बारबोरा स्ट्राइकोवा आणि कजाकिस्तानच्या ९८ व्या मानांकित यूलिना पुतिंतसेवा यांच्या लढतीत विजयी ठरणाºया खेळाडूविरुद्ध होईल.

टॅग्स :Sportsक्रीडा