शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

अंतराळात खेळला जाणार पहिला टेनिस सामना! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 11:45 IST

अंतराळवीर अँड्य्रू फेस्टेल यांचा प्रयोग; टेनिसपटू डेल पोत्रो करणार मार्गदर्शन.

- ललित झांबरेटेनिसच्या इतिहासात लवकरच नवा अध्याय लिहिला जाणार आहे. अमेरिकन वेळेनुसार मंगळवार, 21 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता (भारतीय वेळेनुसार बुधवार, 22 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वा.) अंतराळात पहिल्यांदाच टेनिस खेळले जाणार आहे आणि याचे यु.एस.ओपनच्या फेसबूक पेजवर, यू ट्युबवर आणि ट्विटर हँडलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याशिवाय युएस टेनिस असोसिएशन (युएसटीए) च्या बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटरच्या परिसरातील 120 फुटी व्यासाचा स्टील ग्लोब 'युनीस्फीअर' वरही अंतराळातील हा पहिला टेनिस सामना थ्री डी मध्ये दाखविण्यात येणार आहे.  हा प्रयोग म्हणजे केवळ टेनिसच नाही तर समस्त क्रीडाजगतासाठी नवा इतिहास राहणार आहे. 

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा)च्या आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) हा ऐतिहासिक प्रयोग होणार आहे आणि त्यात नासाच्या अंतराळ मोहिम 56 चे कमांडर फेस्टेल हे आपल्या सहकाऱ्यांसोबत दुहेरीचा एक गेम खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये रिकी अर्नाल्ड (नासा), अॅलेक्झांडर जर्स्ट (युरोपियन स्पेस एजन्सी) आणि सेरेना ऑनन-चॅन्सेलर (नासा) या तीन फ्लाईट इंजिनिअर्सचा समावेश आहे.ही चार मंडळी अंतराळात टेनिस खेळणारे पहिले टेनिसपटू बनण्याचा इतिहास घडविणार आहेत आणि त्यासाठी त्यांना भूतलावरुन युआन मार्टिन डेल पोट्रो हा आघाडीचा टेनिसपटू मार्गदर्शन करणार आहे.

डेल पोत्रो हा सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून 2009 चा यू. एस. ओपन विजेता आहे. टेनिसची आवड असणारे नव्हे, अक्षरशः टेनिसवेडे असलेले कमांडर फेस्टेल हे त्याच्याशी अमेरिकन वेळेनुसार मंगळवारी दुपारी 12.35 वा.(भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री 10 वा.)   व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 20 मिनिटे संवाद साधणार आहेत. त्यातून अंतराळात टेनिस कसे खेळता येईल याचा सल्ला ते डेल पोट्रोकडून घेणार आहे. आपल्याला अशी काही अफलातून संधी मिळेल याची आपण कधी कल्पनासुध्दा केलेली नव्हती, असे डेल पोत्रोने या ऐतिहासिक संधीबद्दल म्हटले आहे. 

जियोफिझिक्समध्ये डॉक्टरेट केलेले कमांडर फेस्टेल म्हणतात की, अंतराळात गुरूत्वाकर्षण नसल्याने चेंडू उसळणारच नाही. तसा गुरुत्वाचाही परिणाम असणार नाही. त्यामुळे टेनिस नेमके कसे खेळायचे हे मोठेच आव्हान असेल. पण आम्ही त्यासाठी तयार आहोत. कदाचित आम्हाला काही वेगळे नियम ठरवावे लागतील. 

कमांडर फेस्टेल यांच्या या प्रयोगाबद्दल व्यावसायिक टेनिसपटूंमध्येही मोठी उत्सुकता आहे. म्हणून जॉन इस्नर, फ्रान्सेस टिफो, स्टिव्ह जॉन्सन, डोनाल्ड यंग आणि केव्हिन अँडरसन या आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंनी त्यांना व्हिडिओ संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. ते कसे खेळतात हे बघून आपणही भविष्यात अंतराळात खेळायचा विचार करू, असे इस्नरने गमतीने म्हटले आहे. 

#TminusNetGeneraton या हॅशटॅगवरून या इतिहासाचे साक्षीदार होता येईल असे 'यूएसओपन' ने ट्विटरद्वारे कळविले आहे.

टॅग्स :TennisटेनिसSportsक्रीडा