शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

फेडररने सातव्यांदा गाठली आॅस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 22:09 IST

गतविजेत्या रॉजर फेडररने शुक्रवारी पुन्हा आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसची पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. द. कोरियाचा चुंग हियोन जखमी होताच त्याने उपांत्य सामना सोडून दिला.

मेलबोर्न: गतविजेत्या रॉजर फेडररने शुक्रवारी पुन्हा आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसची पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. द. कोरियाचा चुंग हियोन जखमी होताच त्याने उपांत्य सामना सोडून दिला. फेडररची अंतिम फेरीत गाठ पडेल ती मारिन सिलिचविरुद्ध. पहिल्यांदा ग्रॅण्डस्लॅमची उपांत्य फेरी गाठणाºया हियोनच्या पायाला त्रास सुरू झाला होता. त्याने माघार घेतली त्यावेळी फेडरर ६-१, ५-२ असा पुढे होता. हियोनने पहिल्या दोन गेममध्ये ‘टाइम आऊट’ घेत पायावर उपचार करून घेतले. तरीही त्रास वाढल्यानंतर त्याने सामना सोडून देण्याचा निर्णय घेतला. एक तास दोन मिनिटे चाललेल्या खेळादरम्यान दुसºया सेटमध्ये २१ वर्षांचा हियोन २-५ असा माघारला होता. त्याचवेळी सामना थांबविण्याची त्याने विनंती केली. हियोनच्या दुखापतीबद्दल फेडरर म्हणाला,‘दुखापतीचे काही सांगता येत नाही, मैदानावर कधी जखम उमळेल हे अखेरपर्यंत कळत नाही. हियोनला असाच त्रास झाला. मात्र तो दिग्गज खेळाडू असल्याने पुन्हा चांगली कामगिरी करण्यास सज्ज होईल.’फेडररने सातव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेतील सहाव्या आणि करियरमधील २० व्या ग्रॅण्डस्लॅमवर त्याचा डोळा आहे. सिलिचविरुद्ध फेडररचेच पारडे जड आहे. अमेरिकन ओपन चॅम्पियन सिलिचविरुद्ध फेडररने नऊपैकी आठ लढती जिंकल्या असून, एकदा पराभव पत्करला आहे. यंदा आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने एकही सेट गमावलेला नाही.बाबोस-म्लादेनोविचजोडी दुहेरीत विजेतीमेलबोर्न: टिमिया बाबोस आणि ख्रिस्टिना म्लादेनोविच या पाचव्या मानांकित जोडीने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसचे महिला दुहेरीचे जेतेपद पटकविले. या जोडीने निर्णायक लढतीत एकतेरिना मकारोवा आणि एलिना व्हेस्रिना या रशियाच्या दुसºया मानांकित जोडीचा फडशा पाडला. हंगेरीची बाबोस आणि फ्रान्सची म्लादेनोविच यांनी अंतिम सामना ६-४, ६-३ असा जिंकला. या जोडीचे हे पहिलेच ग्रॅण्डस्लॅम आहे. याआधी या जोडीने २०१४ च्या विम्बल्डन फायनलमध्ये धडक दिली होती. त्यानंतर २०१५ मध्ये दुबई, मराकाश आणि रोम येथे दुहेरीचे जेतेपद पटकविले. जेतेपदानंतर बाबोस म्हणाली,‘हा अनोखा क्षण आहे. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. म्लादेनोविचसोबत खेळणे शानदार ठरले.’बोपन्नाची वाटचाल दुसºया ग्रॅण्डस्लॅमकडेमेलबोर्न: रोहन बोपन्ना याने हंगेरीची जोडीदार टिमिया बाबोस हिच्या सोबतीने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसची मिश्र दुहेरीची अंतिम फेरी गाठली. यामुळे तो दुसºया ग्रॅण्डस्लॅम जेतेपदानजीक पोहोचला आहे. बोपन्नाने उत्कृष्ट सर्व्हिस केली तर बाबोसने परतीचे उत्तम फटके मारले. या जोडीने उपांत्य सामन्यात ब्राझीलचा मार्सेलो डेमोलियर आणि स्पेनची मारिया मार्टिनेझ जोडीवर ७-५, ५-७, १०-६ ने विजय साजरा केला. मागच्या वर्षी बोपन्नाने कॅनडाची गॅब्रिएला दाब्रोव्हस्की हिच्या सोबतीने फ्रेंच ओपन जिंकून पहिले ग्रॅण्डस्लॅम पटकविले होते. महेश भूपती, लियांडर पेस आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर महत्त्वाची स्पर्धा जिंकणारा बोपन्ना चौथा भारतीय टेनिसपटू आहे.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपन