शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कारकिर्दीतील शंभरावे एटीपी जेतेपद पटकाविण्याची फेडररला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 06:53 IST

आॅस्ट्रेलियन ओपनचा थरार : मरेची मेलबर्नमधील अखेरची स्पर्धा

मेलबर्न : रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच हे दोन्ही दिग्गज सोमवारपासून सुरूहोणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विक्रमी सातवे विजेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने खेळतील, तर अँडी मरे मेलबर्न पार्कवर अखेरच्या वेळेस खेळाडूंना आव्हान देताना दिसेल.

त्याचवेळी दिग्गज फेडरर या स्पर्धेत हॅटट्रिकच्या निर्धाराने खेळणार असून त्याला कारकिर्दीतील शंभरावे एटीपी जेतेपद पटकावण्याची संधी आहे. यामध्ये तो यशस्वी ठरला, तर शंभर एटीपी जेतेपद पटकावणारा फेडरर विश्वातील केवळ दुसरा टेनिसपटू ठरेल. याआधी अमेरिकेचा महान टेनिसपटू जिमी कॉनर्स यानेच शंभर एटीपी जेतेपद पटकावले असून त्याच्या नावावर १०९ जेतेपदांची नोंद आहे.जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू जोकोविच आणि तृतीय मानांकित फेडररला चौथ्या मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हसारख्या युवा खेळाडूंकडून कडवे आव्हान मिळेल, तर झ्वेरेव्ह पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून खेळेल.

मरेने हिप सर्जरीनंतर पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे यावर्षी निवृत्ती पत्करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विम्बल्डन खेळून कारकीर्दीला पूर्णविराम देण्याची त्याची इच्छा होती; परंतु कदाचित आॅस्ट्रेलियन ओपन त्याची अखेरची स्पर्धा ठरू शकते. जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित खेळाडू राफेल नदालच्या तंदुरुस्तीवरदेखील प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे त्याने ब्रिस्बेन स्पर्धेतून माघार घेतली होती; परंतु आता पूर्णपणे तंदुरुस्त असून, नवीन प्रकारच्या सर्व्हिससह स्पर्धेत खेळणार असल्याचा दावा त्याने केला आहे.

फेडरर त्याचा सलामीचा सामना डेनिस इस्तोमिनविरुद्ध खेळेल. याच कोर्टवर फेडररने गतवर्षी त्याचे २0 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी त्याने सहा वेळेसचा चॅम्पियन जोकोविच आणि राय इमर्सन यांची बरोबरी केली होती.जोकोविचचे २०१८ मध्ये सुरुवातीलाच आव्हान संपुष्टात आले होते व त्याला हाताच्या कोपºयावर शस्त्रक्रियाही करावी लागली होती. त्यानंतर खराब कामगिरीमुळे तो अव्वल २० च्या बाहेर फेकला गेला होता.

जोकोविच जुलैमध्ये विम्बल्डन विजेतेपदासह पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला आणि त्यानंतर पूर्ण वर्षात त्याने फक्त तीन सामने गमावून पुन्हा अव्वल स्थानावर कब्जा केला. तो एटीपी फायनल्समध्ये विजेतेपदाच्या लढतीत झ्वेरेव्हकडून पराभूत झाला होता. जोकोविचला आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये पहिल्या फेरीत मंगळवारी अमेरिकेच्या मिशेल क्रूगर याच्याविरुद्ध दोन हात करावे लागेल.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडरर