शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

फेडररने रचला नवीन विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 05:29 IST

लंडन : आठ वेळेसचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील चॅम्पियन रॉजर फेडरर याने विजयासह आणखी एक विक्रम रचला. तसेच अन्य विजेतेपदाच्या ...

लंडन : आठ वेळेसचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील चॅम्पियन रॉजर फेडरर याने विजयासह आणखी एक विक्रम रचला. तसेच अन्य विजेतेपदाच्या सर्वच प्रबळ दावेदारांनी सहजपणे या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये स्थान पटकावण्यात यश मिळवले.फेडररने फ्रान्सच्या लुकास पाउली याचा ७-५, ६-२, ७-६ असा पराभव करीत ग्रँडस्लॅममधील ३५० व्या विक्रमी विजयाची नोंद केली. त्याने १७ व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत स्थान पक्के केले. स्पेनचा राफेल नदालनेदेखील फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाविरुद्ध ६-२, ६-३, ६-२ अशा विजयासह अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. नदाल पुढील फेरीत पोर्तुगालच्या जाओ सोसा याच्याशी खेळेल. जाओ सोसा याने डेन इव्हान्सचा ५ सेटमध्ये पराभव करीत पुरुष एकेरीतील ब्रिटनच्या आशा संपुष्टात आणल्या. जपानच्या केई निशिकोरी याने एई सुगियामाचा पराभव केला. अमेरिकेच्या सॅम कुरे याने आॅस्ट्रेलियाच्या जॉन विलमॅनचा ७-६, ७-६, ६-३ असा पराभव केला.महिला एकेरीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन अ‍ॅश्ले बार्टीने प्रथमच चौथ्या फेरीत स्थान पटकावले. सात वेळेसची चॅम्पियन सेरेना विलियम्सनेदेखील १६ व्यांदा अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. बार्टीने हॅरियट डॉर्ट हिचा ६-१, ६-१ असा पराभव केला, तर सेरेनाने ज्युलिया जॉर्जेस हिच्यावर ६-३, ६-४ अशी मात केली. बार्टी आता अंतिम आठमध्ये पोहोचण्यासाठी अमेरिकेच्या अमानांकित एलिसन रिस्केविरुद्ध दोन हात करील. सेरेनाचा सामना स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारो हिच्याशी होईल. दोन वेळेसची चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा पाच वर्षांत प्रथमच अंतिम १६ मध्ये पोहोचली आहे. क्विटोव्हाने पोलंडच्या मोग्दा लिनेटे हिचा ६-३,६-२ असा पराभव केला.बोपन्ना, शरण पराभूतदिविज शरण, रोहन बोपन्ना यांच्या पराभवाबरोबरच भारताचे विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. बोपन्ना-सबालेंका या जोडीला सिटाक - सिगेमंड या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. शरण आणि यिंगयिंग दुआन यांना एडेन सिल्वा व इवान होयत या जोडीकडून पराभूत व्हावे लागले.