नवी दिल्ली : भारतीय टेनिसस्टार करमन कौर आणि अंकिता रैना यांनी केलेल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर भारताने फेड चषक आशिया ओशियन अ गटात स्थान कायम राखण्यात यश मिळवले. एकेरीतील दोन्ही सामने जिंकत भारताने चिनी तैपइवर २-० ने आघाडी मिळवली.रेलिगेशन प्ले आॅफच्या पहिल्या एकेरीच्या सामन्यात करमनने विजय नोंदवल्यानंतर अंकिता हिने चीए यू ह्सू हिचा ६-४, ५-७, ६-१ ने पराभव केला. विश्व मानांकनात ३७७ व्या स्थानावर असलेल्या चिनी तायपेच्या चीए यू ह्सू हिचा अंकिताने दोन तास चाललेल्या सामन्यात पराभव केला. एकेरीत तिने अपराजित कामगिरी केली. तिने सलग चार सामने जिंकले.करमन हिने एक तास २८ मिनिटे चाललेल्या सामन्यात युडिस चोंग हिचा ७-६, ६-३ ने पराभव करीत दुसरा विजय नोंदवला. जपानने कझाकिस्तानचा २-१ ने पराभव करीत विश्व प्लेआॅफमध्ये जागा पक्की केली.फेड चषकातील अनुभव फायदेशीर : अंकितानवी दिल्ली : फेड चषक स्पर्धेत एकेरीतील सामन्यात आपल्याहून अधिक वरचढ मानांकित खेळाडूंचा पराभव करीत अंकिता रैना हिने छाप सोडली. या स्पर्धेतील अनुभव खूप फायदेशीर ठरेल, असा विश्वास अंकिता हिने व्यक्त केला. कामगिरीच्या जोरावर तिचा आत्मविश्वास उंचावला आहे. २५ वर्षीय अंकिताने विश्व मानांकनात ८१ व्या स्थानावरील युलिया पुतिनसेवा, तसेच चीनच्या लिन झू यासारख्या खेळाडूंचा पराभव केला.
फेड चषक टेनिस : अंकिता, करमन जोडी विजयी; चिनी तैपइला २-०ने नमवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 02:58 IST