शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान नगरसेवकांनी इच्छुक उमेदवारी अर्ज भरणे बंधनकारक, राष्ट्रवादी शहाराध्यक्ष पंचम कलानी यांचे विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 18:52 IST

Ulhasnagar : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विद्यमान नगरसेवकांनी इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरणे शहाराध्यक्ष पंचम कलानी यांनी बंधनकारक केले. यावरून युवानेते ओमी कलानी व पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर - महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विद्यमान नगरसेवकांनी इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरणे शहाराध्यक्ष पंचम कलानी यांनी बंधनकारक केले. यावरून युवानेते ओमी कलानी व पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्यात कलगीतुरा रंगला असून पक्ष्याच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोघांतील वादावर पडदा टाकण्याची मागणी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत. 

उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षात कलानी कुटुंबाची घरवापसी झाल्यानंतर, पक्षाचे शहराध्यक्ष पद पंचम कलानी यांच्याकडे देण्यात आले. तर दुसरीकडे भारत गंगोत्री यांची वर्णी प्रदेश कार्यकारणीवर लावून पक्षातील गंगोत्री गटाला सबुरीने घेण्याचा अप्रत्यक्ष सल्ला देण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी, युवानेते ओमी कलानी, नगरसेवक मनोज लासी व कमलेश निकम यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरवात केली. यामध्ये पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांनाही इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्यास बंधनकारक करण्यात आले. नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरायचे असेलतर गंगोत्री यांनीजी इच्छुक उमेदवारीचा अर्ज शहराध्यक्ष पंचम कलानी यांच्याकडे भरावा. असे वक्तव्य ओमी कलानी यांनी केले. 

ओमी कलानी यांच्या या वक्तव्यावरून गंगोत्री विरुद्ध ओमी कलानी असा सामना रंगल्याचे चित्र शहरात आहेत. इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरणे बंधनकारक असल्याचा सल्ला आम्हाला देऊ नये. असा पवित्रा गंगोत्री यांनी घेऊन ओमी कलानी आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित केला. आम्ही इच्छुक उमेदवारीचा अर्ज शहराध्यक्षा ऐवजी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे भरू शकतो. असे प्रतिआव्हान गंगोत्री यांनी कलानी कुटुंबाला केले. महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर एकाच म्यानात दोन तलवारी कश्या काय राहू शकतो. असा प्रश्न कार्यकर्ते व दोन्ही गटाचे समर्थक विचारीत आहेत.पप्पु कलानी सक्रिय झाल्याने राष्ट्रवादीत चैतन्य माजी आमदार पप्पु कलानी हे जेल बाहेर आल्याने, त्यांच्या झंझावत दौऱ्याने शहरात चैतन्य निर्माण झाल्याची चित्र आहे. यांच्यासह ओमी कलानी, पंचम कलानी, सीमा कलानी, पक्ष प्रवक्ता कमलेश निकम, मनोज लासी, शिवाजी रगडे आदी तरुणांच्या फोजने कलानी महलात विविध कार्यक्रमाची बहेर आली आहे महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विद्यमान नगरसेवकासह इतरांनी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरणे बंधनकारक असल्याचा फतवा शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी काढला

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर