शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक क्रीडा संघटनेने बीसीसीआय कार्यप्रणालीचा करावा अभ्यास- सोमदेव देववर्मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:56 IST

भारताच्या माजी टेनिसपटूने व्यक्त केले स्पष्ट मत

- रोहित नाईक नवी मुंबई : ‘खेळाच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्रीडा संघटनाने बीसीसीआयच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा भारतीय क्रीडाक्षेत्रात व्यवस्थापन नाही, असे म्हटले जाते, तेव्हा त्यातून क्रिकेटला बाजूला ठेवावे लागेल. कारण क्रिकेटला अचूक आणि भक्कम व्यवस्थापन आहे. त्यामुळेच आज भारतात क्रिकेट अव्वल आहे,’ असे स्पष्ट मत भारताचा माजी टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.नेरुळ येथील डॉ. डी. वाय. क्रीडा अकादमी येथे सुरू असलेल्या स्पोर्ट्स फॉर ऑल आंतर शालेय क्रीडा स्पर्धेला उपस्थिती दर्शविलेल्या सोमदेवने ‘लोकमत’शी संवाद साधला. त्याने म्हटले की, ‘क्रिकेट खेळामध्ये शालेय स्तरापासून अचूक व्यवस्थापन आहे. सचिन-धोनीसारखे दिग्गज याच व्यवस्थापनातून पुढे आले आहेत. त्यामुळे इतर खेळांनीही क्रिकेटचे व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे. शिवाय भारतात क्रिकेट संस्कृती खोलपर्यंत रुजलेली आहे. अशी संस्कृती प्रत्येक खेळाला रुजवता आली पाहिजे. हे शक्य झाले, तरच खऱ्या अर्थाने देशात क्रीडासंस्कृती निर्माण होईल.’भारतीय टेनिसविषयी सोमदेव म्हणाला, ‘भारतीय टेनिसचा नवा स्टार कोण असेल, असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जातो, पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. ९०च्या दशकामध्ये लिएंडर पेस भारताचा चेहरा होता. मात्र, तो दुहेरी स्पर्धांमध्ये वळल्यानंतर भारताला केवळ सानिया मिर्झाच्या रूपाने एक चेहरा मिळाला, पण त्यानंतर पुन्हा हा प्रश्न उपस्थित झाला आणि तो अद्याप सुटलेला नाही.’टेनिस खेळाचा प्रसार करण्यातही अपयश आल्याचे सांगताना सोमदेव म्हणाला की, ‘आपल्याकडे खेळाडूंची समस्या नसून, योग्य प्रक्रियेचा असलेला अभाव ही मुख्य समस्या आहे. आपल्याकडे नेहमीच विविध खेळांसोबत तुलना होते आणि हे थांबविले पाहिजे. प्रत्येक खेळ वेगळा आहे. टेनिससाठी आपल्याकडे अजूनही तज्ज्ञ प्रशिक्षकांची वानवा आहे. शिवाय तज्ज्ञ प्रशिक्षक घडविण्यातही आपण मागे असून, यासाठी आपल्याकडे कोणती प्रक्रियाही नाही.’तसेच, ‘आपल्याकडे आयटीएफआय मान्यताप्राप्त अनेक प्रशिक्षक आहेत, पण त्या तुलनेत गुणवान खेळाडू मात्र घडलेले नाहीत. ही समस्या गेल्या २० वर्षांपासून आहे आणि अजूनही आपण ती सोडविण्यात अपयशी ठरत आहोत. त्यामुळेच आजचा खेळाडू हा स्वत:च्या, त्याच्या कुटुंबीयांच्या आणि वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मेहनतीच्या जोरावर पुढे जात आहे, पण टेनिस खेळातील व्यवस्थापनाचे यामध्ये काहीच योगदान नाही,’ अशी खंतही सोमदेवने या वेळी व्यक्त केली.१९९९ सालच्या सुमारास मी १४ व १६ वर्षांखालील गटात चमक दाखविली. त्यानंतर, मी देशाच्या सर्वोत्तम युवा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले, पण तरीही मला पुढील मार्गदर्शनासाठी खूप झुंजावे लागले होते. आजही तीच परिस्थिती इतर युवा खेळाडूंच्या बाबतीत कायम आहे. त्यामुळेच हे चित्र बदलले, तरच भारतीय टेनिसची प्रगती होईल.- सोमदेव देववर्मन

टॅग्स :TennisटेनिसBCCIबीसीसीआय