शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डॉमनिक थिएमचा झंझावात कायम, जोकोविचला नमवून गाठली उपांत्य फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:09 IST

ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमने एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील धमाकेदार कामगिरी कायम राखताना दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला.

लंडन : ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमने एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील धमाकेदार कामगिरी कायम राखताना दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. या शानदार कामगिरीसह त्याने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. याआधी सलामीच्या सामन्यात थिएमने दिग्गज खेळाडू रॉजर फेडररला पराभूत केले होते.पाचव्या मानांकित थिएमने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सर्बियाच्या जोकोविचला तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात ६-७, ६-३, ७-६ असे नमविले. पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या थिएमने झुंजार खेळ सादर करत बाजी मारली. त्याचवेळी दुसरीकडे, सलामीचा सामना गमावलेल्या फेडररने विजयी पुनरागमन करताना इटलीच्या मातेओ बेरेतिनी याचा ७-६, ६-३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.या विजयासह फेडररने स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले असून अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता त्याला जोकोविचचे कडवे आव्हान परतवावे लागेल. या दोघांमध्येच यंदाच्या विम्बल्डनची अंतिम लढत रंगली होती. त्यामुळे पुन्हा एकदा टेनिसप्रेमींना टेनिसचा खरा थरार पाहण्याची संधी मिळणार आहे. (वृत्तसंस्था)