शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डेव्हिस चषक टेनिस; लिएंडर पेसचे पाकविरुद्ध पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:22 IST

पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी गुरुवारी अनुभवी दिग्गज लिएंडर पेस याचे वर्षभराहून अधिक काळानंतर पुनरागमन झाले.

नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस लढतीसाठी गुरुवारी अनुभवी दिग्गज लिएंडर पेस याचे वर्षभराहून अधिक काळानंतर पुनरागमन झाले. याशिवाय पाकविरुद्ध खेळण्यास आधी नकार देत व नंतर इस्लामाबादला जाण्यास तयार झालेले सुमित नागल, रामकुमार रामनाथन, शशिकुमार मुकुंद आणि रोहण बोपन्ना यांना देखील संघात स्थान देण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव या खेळाडूंनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता.अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) जाहीर केलेल्या संघात जीवन नेदुनचेझियन, साकेत मायनेनी, व सिद्धार्थ रावत यांना स्थान मिळाले. एआयटीए लढतीसाठी ५ खेळाडूंचा संघ जाहीर करून संघात २ राखीव खेळाडू ठेवले जातात. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद येथे आयोजित ही लढत तटस्थस्थळी खेळविण्याच्या विचारात असलेला आंतरराष्टÑीय महासंघ अद्याप पाकने दाखल केलेल्या अपीलावर गंभीर विचार करीत असला, तरी एआयटीएने संघ जाहीर केला.अव्वल खेळाडू प्रजनेश गुणेश्वरनच्या अनुपस्थितीत एकेरीत भारताची मदार सुमित नागल (१२७ वी रँक) व रामकुमार(१२६) यांच्यावर असेल. मुकुंद (२५०) तसेच मायनेनी (२६७) हेही बॅकअप खेळाडू असतील. संघात प्रथमच बोपन्ना, पेस व नेदुनचेझियन यांच्या रुपात दुहेरीचे तीन तज्ज्ञ खेळाडू आहेत. (वृत्तसंस्था)>पाकविरुद्ध लढत १४ आणि १५ सप्टेंबर रोजी होणार होती. त्यासाठी निवडण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या संघात नागलचा समावेश नव्हता. जखमी असल्याने त्याने माघार घेतली होती. दिविज शरण आणि प्रजनेश यांना संघात स्थान देण्यात आले होते. तथापि इस्लामाबादमधील सुरक्षेच्या चिंतेमुळे सामन्याला उशीर झाल्याने आता दोघेही खासगी कारणास्तव उत्सुक नाहीत. शरण २३ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होत असून पुढील दोन आठवडे तो विदेशात असेल. प्रजनेश देखील २८ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होत आहे.>पाकिस्तानात खेळण्यास उत्सुक असलेल्या पेसने एप्रिल २०१८ मध्ये चीनविरुद्ध ऐतिहासिक दुहेरी विजयाची नोंद केली होती. त्यानंतर मात्र एआयटीएने निवडीसाठी त्याच्या नावाचा विचारच केला नव्हता. बोपन्नाच्या सोबतीने डी झेंग- माओ गोंग या चीनच्या जोडीवर मात करीत पेस डेव्हिस चषकाच्या इतिहासात दुहेरीत सर्वात यशस्वी खेळाडू बनला होता. त्याचा हा ४३ वा विजय होता.पेसने इटलीचा निकोला पिएत्रेंगेली (४२ विजय) याला मागे टाकले होते. निवड समितीच्या बैठकीला बिगर खेळाडू कर्णधार रोहित राजपाल, बलरामसिंग, झिशान अली आणि अंकिता भांबरी यांनी हजेरी लावली तर नंदनबाळ हे व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे जुळले होते..भारतीयटेनिस संघ :सुमित नागल, रामकुमार रामनाथन, शशीकुमार मुकुंद, साकेत मायनेनी, रोहण बोपन्ना, लियांडर पेस, जीवन नेदुनचेझियान आणि सिद्धार्थ रावत.बिगर खेळाडू कर्णधार :रोहित राजपाल.प्रशिक्षक : झिशान अली.फिजियो : आनंद कुमार.संघ व्यवस्थापक :सुंदर अय्यर.