शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

डेव्हिस चषक ; रामकुमारला सोपा ‘ड्रॉ’, फिटनेसअभावी साकेत बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:53 IST

कॅनडाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला पहिल्या दिवशी गुण मिळू शकतो. कारण रामकुमार रामनाथन याला सोपा ‘ड्रॉ’ मिळाला आहे. फिटनेसच्या कारणावरून साकेत मिनेनी संघाबाहेर पडला आहे.

एडमंटन : कॅनडाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला पहिल्या दिवशी गुण मिळू शकतो. कारण रामकुमार रामनाथन याला सोपा ‘ड्रॉ’ मिळाला आहे. फिटनेसच्या कारणावरून साकेत मिनेनी संघाबाहेर पडला आहे.विश्व क्रमवारीत १५४ व्या स्थानावर असलेल्या रामकुमारला २०२ व्या स्थानावर असलेल्या ब्राडले शनूरविरुद्ध खेळायचे आहे. त्याचवेळी यूकी भांबरी ५१ व्या स्थानावर असलेला कॅनडाचा खेळाडू डेनिस शापोवालोव याच्याविरुद्ध लढत देईल. कॅनडा संघाने खराब फॉर्ममध्ये असलेला वासेक पोस्पिली याला विश्रांती दिली आहे. एटीपी टूरमध्ये त्याने सलग पाच सामने गमविले.भारताचा बिगरखेळाडू कर्णधार महेश भूपती हा मिनेनीच्या जागी रोहण बोपन्नासोबत पूरव राजा याला संधी देऊ शकतो. बोपन्ना- राजा ही जोडी डॅनियल नेस्टर- पोस्पिलीविरुद्ध खेळेल. संघात सहभागी असलेल्या राखीव खेळाडूंपैकी एन. श्रीराम बालाजी याच्या पायाला दुखापत झाल्याने राजाला ऐनवेळी संघात स्थान देण्यात आले. अखेरच्या दिवशी परतीच्या सामन्यात यूकी शनूरविरुद्ध तसेच रामकुमार हा शापोवालोवविरुद्ध खेळेल.‘ड्रॉ’बद्दल भूपतीने समाधान व्यक्त केले. तो म्हणाला,‘ रामकुमारने सुरुवात करावी अशी आमची इच्छा होती.’ दुहेरी जोडी बदलल्याबाबत तो म्हणाला,‘आमचा सर्वोत्कृष्ट संघ दुहेरी संघ आहे. साकेत शारीरिकदृट्या तंदुरुस्त नाही. पायाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर कोर्टवर उतरलेल्या मिनेनीने पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध ऐनवेळी माघार घेतली होती. त्यावेळी तत्कालीन कर्णधार आनंद अमृतराज याने ऐनवेळी पेसचा जोडीदार म्हणून विष्णू वर्धनची निवड केली होती. मिनेनी नंतर उझबेकिस्तानविरुद्ध देखील खेळला नव्हता. त्यावेळी बोपन्नाला बालाजीची साथ घ्यावी लागली होती. (वृत्तसंस्था)सरावाचा लाभ...भूपती म्हणाला, ‘न्यूयॉर्कमधील सरावाचा खेळाडूंना लाभ झाला. यामुळे स्वत:चे फिटनेस त्यांना कळले, तसेच आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली. राफेल नदाल, ज्यो विल्फ्रेड त्सोंगा व मार्टिन डेल पेट्रो यासारख्या दिग्गजांना नमविणाºया शापोवालोवचे यूकीपुढे आव्हान असेल. ‘ विजयासाठी मी सर्वस्व पणाला लावेन’, असे यूकी म्हणाला.

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत