शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कॅरोलिन वोज्नियाकी पहिल्याच फेरीत बाद, नदाल, जोकोविच यांची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 04:03 IST

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत माजी ऑस्ट्रेलियन ओपन विजेती डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकी हिला अनपेक्षित पराभवासह पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.

पॅरीस : फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत माजी ऑस्ट्रेलियन ओपन विजेती डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकी हिला अनपेक्षित पराभवासह पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. पुरुष गटात राफेल नदाल व नोव्हाक जोकोविच यांनी अपेक्षित विजयी सलामी दिली.जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू वोज्नियाकीला जागतिक क्रमवारीत ६८व्या स्थानावरील रशियाच्या वेरोनिका कुदेरमेतोवाकडून ६-०, ३-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व राखलेल्या वोज्नियाकीने सलग सहा गेम जिंकत दिमाखात सुरुवात केली. मात्र यानंतर वेरोनिकाने सलग दोन सेट एकतर्फी जिंकताना धक्कादायक विजयाची नोंद केली. अन्य सामन्यात चौथ्या मानांकीत नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सने फ्रान्सच्या पाउलिन पारमेंटियरचा ६-३, ६-४ असा पराभव करुन विजयी सुरुवात केली.दुसरीकडे, दिग्गज राफेल नदालने दिमाखात विजयी सलामी दिली. ‘क्ले कोर्टचा बादशहा’ अशी ओळख असलेल्या नदालने एकतर्फी लढतीत जर्मनीच्या याननिक हान्फमनचा एक तास ५७ मिनिटांमध्ये ६-२, ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला. नदालच्या ताकदवान खेळापुढे याननिकचा काहीच निभाव लागला नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा एकाच मोसमात चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या निर्धाराने खेळणाºया जोकोविचने शानदार विजयी सलामी देताना पोलंडच्या हुबर्ट हरकाज याचा ६-४, ६-२, ६-२ असा पराभव केला.रशियाच्या दानिल मेदवेदेवला पहिले दोन सेट जिंकल्यानंतरही फ्रान्सच्या पियरे ह्यूज हरबर्टविरुद्ध ६-४, ६-४, ३-६, २-६, ५-७ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)>दुखापतीमुळे क्विटोव्हाची माघारडाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमधून माघार घेतल्यानंतर पेट्रा क्विटोव्हाने सोमवारी विम्बल्डन स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त राहील, अशी आशा व्यक्त केली.सहावे मानांकनप्राप्त व दोन वेळेसची विम्बल्डन चॅम्पियन क्विटोव्हाने दोन ते तीन आठवडे कोर्टपासून दूर राहणार असल्याचे सांगितले. तिने म्हटले की, ‘माझ्या हाताच्या पुढील भागाला दुखापत झाली असल्याने मला खेळण्यास त्रास होत आहे.’‘मी तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन खेळण्यास सुरू करेन. यामुळे मला ग्रासकोर्टवर पुनरागमन करण्यास मदत मिळेल. फ्रेंच ओपनमधून माघार घेणे निराशाजनक आहे,’ असेही क्विटोव्हाने यावेळी म्हटले.

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदाल