शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन : स्टार राफेल नदालची सहज विजयासह आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 03:41 IST

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अपेक्षित खेळ करताना गुरुवारी आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

मेलबोर्न : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अपेक्षित खेळ करताना गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, स्पर्धेत प्रदुषित पावसाच्या रुपाने पुन्हा नवे आव्हान निर्माण झाले. कोर्टवर चिखल झाल्यामुळे ते खेळण्यायोग राहिले नाही. स्थानिक स्टार खेळाडू निक किर्गियोसने चुरशीच्या लढतीत विजयासह तिसरी फेरी गाठली. आॅस्ट्रेलियाच्या किर्गियोसने चार सेटमध्ये फ्रान्सच्या जाईल्स सिमोनचा पराभव केला, तर महिला एकेरीत विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हालेपने ब्रिटेनच्या हॅरियर डार्टचा पराभव केला.जंगाल आगीतील पिडितांना मदतसाठी रक्कम गोळा करण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे लोकप्रिय झालेल्या किर्गियोसने चार सेटमध्ये ६-२, ६-४, ४-६, ७-५ ने विजय मिळवला. या विजयासह किर्गियोसने चौथ्या फेरीत राफेल नदालविरुद्ध संभाव्य लढतीकडे आगेकूच केली. नदालने सहजपणे आगेकूच करताना अर्जेंटिनाच्या फेडरिको डेल्बोनिस याचा ६-३, ७-६(७-४), ६-१ असा पराभव केला.स्पर्धेला जंगलातील आगीमुळे परसलेला धुर, राख, मुसळधार पाऊस व जोरदार वारा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. त्याआधी, धुळ-माती मिश्रित पावसामुळे मेलबोर्न पार्क कोर्टवर चिखलाचा थर साचला. त्याला हटविण्यासाठी अनेक तास लागले व बाहेरच्या कोर्टचा उपयोगही करता आला नाही.खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर जर्मनीच्या अलेक्झँडर झ्वेरेवने सूर गवसल्याचे संकेत देताना इगोर गेरासिमोव्हचा ७-६ (७/५), ६-४, ७-५ असा पराभव केला. पाचव्या मानांकित डोमिनिक थिएमला आॅस्ट्रेलियाच्या १४० व्या क्रमांकाचा खेळाडू अ‍ॅलेक्स बोल्टविरुद्ध पाच सेटपर्यंत घाम गाळावा लागला. थिएमने या लढतीत संयम कायम राखत ६-२, ५-७, ६-७(५/७), ६-१, ६-२ असा झुंजार विजय नोंदवला.महिला एकेरीत हालेपने डार्टचा ६-२, ६-४ असा पराभव केला, तर बेलिंडा बेनसिचने माजी फ्रेंच ओपन चॅम्पियन येलेना ओस्टापेंकोचा पराभव केला. दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन गर्बाइन मुगुरुजाने स्थानिक खेळाडू अजला टोमलानोविचचा ६-३, ३-६, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव केला. (वृत्तसंस्था)सानियाची पहिल्याच फेरीत माघारभारताची स्टार सानिया मिर्झाला आॅस्ट्रेलियन ओपनच्या सलामीलाच कोर्टबाहेर पडावे लागले. दुखापतीने सानियाने दुहेरीचा पहिला सामना अर्ध्यावर सोडून दिला. सानिया व युक्रेनची नादिया किचेनोक यांनी मागच्या आठवड्यात होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेत जेतेपद पटकवले होते. गुरुवारी सानिया-नादिया चीनच्या शियुआन हान-लिन झूविरुद्ध २-६, ०-१ अशा पिछाडीवर होत्या. सरावादरम्यान सानियाच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. सानिया-किचनोक २-४ असे पिछाडीवर असताना चीनच्या प्रतिस्पर्धी जोडीने त्यांची सर्व्हिस मोडित काढून सेट जिंकला. सानियाने पहिल्या सेटनंतर मेडिकल टाइमआऊट घेतला. दुसºया सेटमध्येही सानिया पिछाडीवर होती.

 

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन