शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

Australian Open: नदालचा सरळ सेट्समध्ये विजय; सोफिया केनिनचीही आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 05:34 IST

Australian Open:वीस वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदालने जागतिक क्रमवारीत ५६ व्या स्थानावरील खेळाडूविरुद्ध दोन तासांपेक्षा कमी वेळेत ६-३, ६-४, ६-१ ने विजय नोंदवला.

मेलबोर्न : स्टार खेळाडू राफेल नदालने मंगळवारी लास्लो जेयरचा सरळ सेट्समध्ये पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले, तर महिला एकेरीत गतचॅम्पियन सोफिया केनिनने पहिल्या फेरीत विजय मिळवित आगेकूच केली. वीस वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदालने जागतिक क्रमवारीत ५६ व्या स्थानावरील खेळाडूविरुद्ध दोन तासांपेक्षा कमी वेळेत ६-३, ६-४, ६-१ ने विजय नोंदवला. दुसऱ्या सेटमध्ये नदालने ज्यावेळी सेट जिंकण्यासाठी सर्व्हिस करीत होता त्यावेळी जेयरला तीन ब्रेक पॉइंट मिळालेे; पण त्याचा त्याला लाभ घेता आला नाही. तो तिसऱ्या सेटमध्ये बी ब्रेक पॉइंट लाभ घेऊ शकला नाही.स्पेनच्या ३४ वर्षीय नदालमध्ये या सामन्यादरम्यान कंबरेच्या दुखण्याचे कुठले संकेत दिसले नाही. तो गेल्या आठवड्यात एटीपी कपमध्ये कंबरेच्या दुखापतीमुळे स्पेनतर्फे खेळला नव्हता तर सरावादरम्यानही तो कंबरेच्या दुखापतीमुळे त्रस्त होता.एटीपी कप जिंकणाऱ्या रशियन संघाचा खेळाडू चांगल्या फॉर्मात दिसला. चौथ्या मानांकित डेनिल मेदवेदेवने वासेक पोसपिसिलचा ६-२, ६-२, ६-४ ने पराभव करीत सलग विजयाची संख्या १५पर्यंत पोहचविली तर सातव्या मानांकित आंद्रेय रुबलेव्हने यानिक हेंफमॅनचा ६-३, ६-३, ६-४ने पारभव केला.महिला एकेरीत गत चॅम्पियन सोफिया केनिनने संघर्षपूर्ण लढतीत विजय नोंदवला. अमेरिकची २२ वर्षीय खेळाडू सोफियाने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळविणारी ऑस्ट्रेलियाची जागतिक क्रमवारीतील १३३व्या क्रमांकाची खेळाडू मेडिसन इंगलिसचा मेलबोर्न पार्कमध्ये सरळ सेट्समध्ये ७-५, ६-४ ने पराभव केला. गेल्यावर्षी मलबोर्नमध्ये फायनलमध्ये सोफिया विरुद्ध पराभूत होणारी दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन गरबाईन मुगुरुजाने रशियाच्या मार्गरिटा गॅसपेरिनचा ६-४, ६-० ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. दोन वेळची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन व गेल्या वर्षीची अमेरिकन ओपन उपविजेता व्हिक्टोरिया अजारेंकाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दुसऱ्या सेटदरम्यान तिला कोर्टवर उचपार घ्यावे लागले. त्यानंतर तिने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ७-५, ६-४ ने पराभव करीत आगेकूच केली. कोविड-१९ चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तीन आठवडे विलगीकरणात घालविणाऱ्या पॉला बेडोसाला सामना जिंकण्यासाठी सर्व्हिस करण्याची संधी मिळाल्यानंतरही रशियाच्या क्वालिफायर ल्युडमिला सेमसोनोव्हा विरुद्ध ६-७, ७-६, ७-५ ने पराभव स्वीकारावा लागला.स्पेनचा १७ वर्षीय कार्लोस अल्कारेज २०१४ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजय नोंदविणाऱ्या थनासी कोकिनाकिसनंतर ग्रँडस्लॅममध्ये सामना जिंकणारा सर्वांत कमी वयाचा पुरुष खेळाडू ठरला. अल्कारेजने नेदरलँडच्या २५ वर्षीय बोटिक वान डी जेंडचुपचा ६-१, ६-४, ६-४ ने पराभव केला.नागलचे आव्हान संपुष्टातभारताच्या सुमित नागलला पहिल्या फेरीत लिथुआनियाच्या रिकार्डस बेरांकिसविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बेरांकिसविरुद्ध नागलला २-६, ५-७, ३-६ने पराभव स्वीकारावा लागला. २३ वर्षीय नागलने दुसऱ्या सेटमध्ये सलग चार गेम जिंकत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण बेरांकिसचे वर्चस्व मोडण्यात तो अपयशी ठरला.‘गेले १५ दिवस माझ्यासाठी खडतर होते. कंबरेच्या दुखण्यामुळे त्रस्त होतो. आज त्यापासून बचाव करायचा होता आणि मी तेच केले. मला सरळ सेट्समध्ये विजयाची गरज होती.’- नदाल 

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनRafael Nadalराफेल नदाल