शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

आॅस्ट्रेलियन ओपन :हालेपची अंतिम फेरीत, थरारक सामन्यात कर्बेरला दिला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:43 IST

अत्यंत चुरशीच्या आणि थरारक रंगलेल्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रुमनियाच्या सिमोना हालेप हिने जर्मनीच्या अँजोलिका कर्बेर हिचे तगडे आव्हान तीन सेटमध्ये परतावून आॅस्ट्रेलिया ओपन महिला गटाची अंतिम फेरी गाठली. त्याच वेळी, पुरुष गटामध्ये क्रोएशियाच्या मरिन चिलिच याने अपेक्षित विजय मिळवताना ब्रिटनच्या कायल एडमंड याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

मेलबोर्न : अत्यंत चुरशीच्या आणि थरारक रंगलेल्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रुमनियाच्या सिमोना हालेप हिने जर्मनीच्या अँजोलिका कर्बेर हिचे तगडे आव्हान तीन सेटमध्ये परतावून आॅस्ट्रेलिया ओपन महिला गटाची अंतिम फेरी गाठली. त्याच वेळी, पुरुष गटामध्ये क्रोएशियाच्या मरिन चिलिच याने अपेक्षित विजय मिळवताना ब्रिटनच्या कायल एडमंड याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला.रोड लावेर अरेनामध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात हालेप आणि कर्बेर यांच्यातील लढत तीन सेटपर्यंत रंगला. पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर कर्बेरने जबरदस्त पुनरागमन केले. या वेळी, हालेपकडून अनेक चुका झाल्या. तिचे अनेक फटके कोर्टबाहेर गेल्याने त्याचा फायदा घेत कर्बेरने दुसरा सेट जिंकत सामना १-१ असा बरोबरीत आणला. तरी पुन्हा एकदा तिसºया सेटमध्ये आघाडी घेत हालेपने ३-१ असे नियंत्रण मिळवले होते. परंतु, कर्बेरने झुंजार खेळ करत सामना बरोबरीत आणत आघाडीही घेतली. तिसºया सेटमध्ये दोघींचाही खेळ तोडीस तोड झाला. या वेळी दोघींनीही प्रत्येकी २ मॅच पॉइंट वाचवताना उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, मोक्याच्या वेळी दमछाक झाल्यानंतर कर्बेरकडून माफक चुका झाल्या आणि त्या जोरावर हालेपने अखेर ६-३, ४-६, ९-७ असा रोमांचक विजय मिळवला. तब्बल २ तास २० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हालेपला चांगलेच झुंजावे लागले.दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या डेन्मार्कच्या कॅरोलिना वोज्नियाकी हिने सहज बाजी मारताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. वेगवान खेळ केलेल्या कॅरोलिनाने बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचे आव्हान ६-३, ७-६ असे परतावले. एक तास ३७ मिनिटांमध्ये बाजी मारलेल्या कॅरोलिनाने तिसºयांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपन