शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

आॅस्ट्रेलियन ओपन - फेडररची विजयी सलामी, वावरिंकाचाही विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 3:11 AM

गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे फेड एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या फेडररने पहिल्या फेरीत विजय मिळवला.

मेलबार्न : गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे फेड एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या फेडररने पहिल्या फेरीत विजय मिळवला. त्याने अल्जात बेडेन याचा सरळ सेटमध्ये पराभव केला. २०१४ चा विजेता असलेला आणि सध्या दुखापतीतून पुनरागमन करीत असलेला स्वित्झर्लंडचा स्टान वावरिंका याने लिथुआनियाच्या रिकार्ड्स बेरांकिसचा ६-३, ६-४, २-६, ७-६ ने पराभव केला.२० वे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या इराद्याने उतरलेल्या फेडररने आज जबरदस्त खेळ केला. त्याने स्लोवेनियाच्या खेळाडूचा एक तास ३९ मिनिटांत पराभव केला. हा सामना त्याने ६-३, ६-४, ६-३ अशा सेटने जिंकला.विजयानंतर ३६ वर्षीय फेडरर म्हणाला, की यावयात स्पर्धा जिंकण्याच्या फेव्हरेटमध्ये मी नाही. माझे स्वप्न हे अधिक खेळण्याचे आहे आणि आपल्याकडे असे खेळाडू आहेत जे खूप काळ खेळले आहेत. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते.फेडररचा पुढील सामना जर्मनीच्या जॉन स्टफ्फविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, वावरिंका याला विजयासाठी २ तास ४७ मिनिटे संघर्ष करावा लागला.शारापोव्हा,केर्बरची आगेकूचमाजी चॅम्पियन आणि टेनिससुंदरी असलेल्या रशियाच्या मारिया शारापोव्हा आणि अँजेलिक केर्बर यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुसºया फेरीत धडक दिली. कॅनडाचा मिलोसरॉनिक मात्र पराभूत झाला. डोपिंगच्या कारणामुळे १५ महिन्यांच्या बंदीचा फटका सहन केल्यानंतर शारापोव्हा कोर्टवर उतरली. ती आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसून आली. २००८ मध्ये विजेतेपद पटकाविलेल्या शारापोव्हाने ततयाना मारिया हिचा ६-१, ६-४ सेटने पराभव केला. आता तिचा पुढील सामना १४ वी मानांकित लाटवियाच्या अनास्तासिया सेवास्तोवा किंवा अमेरिकेच्या वारवारा लेपचेंका यांच्याविरुद्ध होईल. जगातील नंबर वन खेळाडू केर्बरने अन्ना लीना फ्राईडसॅमचा ६-०, ६-४ असे सेट जिंकून पराभव केला.जोकोविच दुसºया फेरीतसहा वेळचा चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने अमेरिकेच्या डोनाल्ड यंग याचा ६-१, ६-२, ६-४ ने पराभव केला. याबरोबरच त्याने दुसºया फेरीत धडक दिली. माजी नंबर वन खेळाडू असलेला सर्बियाचा जोकोविच हा सहा महिन्यांपासून टेनिसपासून दूर होता. आता त्याचा पुढील सामना फ्रान्सच्या गाएल मोंफिल्स किंवा स्पेनच्या जोअमे मुनार यांच्याविरुद्ध होईल....हिच्या ओरडण्याचे काही तरी करा!मेलबार्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अमेरिकेच्या कोको वांदेवेघेच्या केळी हट्टाची चर्चा राहिली तर आज दुसºया दिवशी बेलारूसच्या एरिना साबालेंकाच्या सामन्यादरम्यानच्या जोरदार आवाजाची चर्चा राहिली. ही १९ वर्षीय बेलारशियन खेळाडू आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅशली बार्टीकडून तीन सेटमध्ये पराभूत झाली, परंतु तिच्या खेळापेक्षा प्रत्येक फटक्यावेळी ती करणाºया जोरदार आवाजाचीच चर्चा राहिली. साबालेंकाच्या आवाजापायी प्रेक्षकही एवढे हैराण झाले,की त्यांनी नंतर-नंतर तिच्या ओरडण्याचीच नक्कल करायला सुरुवात केली आणि पंचांना सामन्यादरम्यान शांतताराखण्याचे वारंवार आवाहन करावे लागले.साबालेंकाचा हा आवाज टिष्ट्वटरवरही ट्रेंडिंग राहिला. बºयाच माजी टेनिसपटूंनी तिच्या आवाज करण्याच्या सवयीबद्दल कॉमेंट टाकल्या. पॅम श्रायव्हर म्हणाली, की साबालेंका ३४७ प्रकाराचे वेगवेगळे आवाज काढू शकते ही खरोखरच विलक्षण टॅलेंट आहे.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनRoger fedrerरॉजर फेडरर