शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ऑस्ट्रेलियन ओपन: जोकोविच-नदाल जेतेपदासाठी भिडणार; रंगतदार लढतीची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:29 IST

नोव्हाक जोकोविच व राफेल नदाल यांच्यादरम्यान आज रविवारी १०७ व्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे.

मेलबोर्न : नोव्हाक जोकोविच व राफेल नदाल यांच्यादरम्यान आज रविवारी १०७ व्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. या लढतीच्या निमित्ताने आधुनिक युगातील अतुलनीय प्रतिस्पर्धा अनुभवायला मिळणार आहे.टेनिस जगतात या दोन अव्वल खेळाडूंच्या नावावर एकूण ३१ ग्रँडस्लॅम विजेतेपदाची नोंद आहे. हे दोन्ही खेळाडू आज आपल्या जेतेपदाच्या संख्येमध्ये भर घालण्यास इच्छुक आहेत.जोकोविचने जर जेतेपद पटकावले तर ते त्याचे या स्पर्धेतील विक्रमी सातवे जेतेपद ठरेल तर ३२ वर्षीय नदालने २००९ नंतर येथे पुन्हा विजेतेपदाचा मान मिळवला तर ओपन युगात तो चार ग्रँडस्लॅम किमान दोनदा जिंकणारा पहिला खेळाडू ठरेल. नदालचे हे १८ वे ग्रँडस्लॅम जेतेपद राहील.तो सार्वकालिक सर्वाधिक ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या रॉजर फेडररच्या (२० जेतेपद) समीप जाईल. जोकोविचने जेतेपद पटकावले तर तो १५ व्या विजेतेपदासह पीट सॅम्प्रासचा विक्रम मोडेल आणि सर्वाधिक ग्रँडस्लॅम पटकावणाºया खेळाडूंच्या यादीत तिसºया स्थानी येईल.जोकोविच व नदाल यांच्यादरम्यान ही ५३ वी लढत आहे तर उभय खेळाडू आठव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत झुंजणार आहेत. उभय खेळाडूंदरम्यान आतापर्यंत खेळल्या गेलेल्या लढतीत जोकोविचने २७ वेळा बाजी मारली आहे तर नदालने २५ सामने जिंकले आहेत. ग्रँडस्लॅम फायनलमध्ये मात्र नदालचे पारडे वरचढ आहे. त्याने चारवेळा जेतेपद पटकावले तर तीनवेळा जोकोविचविरुद्ध त्याला पराभव स्वीकारावा लागला. नदाल जोकोविचविरुद्ध गेल्या तीन ग्रँडस्लॅम फायनलमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.ग्रँडस्लॅममध्ये सर्व प्रकारच्या लढतींमध्ये नदालने जोकोविचविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. नदालने नऊ सामने जिंकले आहे तर पाच सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. या दोघांचा अपवाद वगळता ओपन युगामध्ये कधीच उभय खेळाडूंदरम्यान एवढ्या लढती झालेल्या नाहीत आणि कधीच एवढ्या रंगतदार लढती झालेल्या नाहीत.उभय खेळाडूंदरम्यान आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये २०१२ ला खेळल्या गेलेली अंतिम लढत विक्रमी ५ तास ५३ मिनिट रंगली होती. ग्रँडस्लॅम इतिहासातील ही सर्वांत प्रदीर्घ काळ रंगलेली अंतिम लढत होती. काहींच्या मते हा सर्वांत शानदार अंतिम सामना होता.जोकोविचने अंतिम सेटमध्ये ७-५ ने सरशी साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते, पण यानंतर दोन्ही खेळाडू एवढे थकले होते की, पुरस्कार वितरण समारंभादरम्यान त्यांना उभे राहणे कठीण जात होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन