शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियन ओपन : जोकोच्या स्वप्नांचा चुराडा! कोरियन ह्युयांग चुंगने केले स्पर्धेबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:58 IST

पहिला सेट संघर्ष करीत जिंकला खरा; पण २१ वर्षीय कोरियन ह्युयांग चुंगने सहा वेळचा विजेता सर्बियाच्या नोवाक जोकोवीचला सामना जिंकू दिला नाही.

मेलबर्न : पहिला सेट संघर्ष करीत जिंकला खरा; पण २१ वर्षीय कोरियन ह्युयांग चुंगने सहा वेळचा विजेता सर्बियाच्या नोवाक जोकोवीचला सामना जिंकू दिला नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात ह्युयांगने जोकोचा ७-६, ७-५, ७-६ गुणांनी पराभव करून आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खळबळ उडवून दिली. याबरोबच जोकोच्या स्वप्नांचा चुराडा झाला. चौथ्या फेरीत जोको एक्स्प्रेस थांबली.गतविजेता रॉजर फेडरर आणि टॉमस बर्डीच यांनी सरळ सेटमध्ये विजय नोंदवले. ‘फेड एक्स्प्रेस’ (फेडरर) जलदगतीने धावत आहे.त्याला विजयाचा दावेदार मानला जात आहे. साजेशी कामगिरी करीत स्वित्झर्लंडच्या फेडररने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. माजी विजेत्या एंजेलिक कर्बर आणि मेडिसन किज यांनी महिला गटातील उपांत्यपूर्व फेरी गाठली.फेडररचा एक वेळ ट्रेनिंग जोडीदार म्हणून राहिलेल्या हंगेरीच्या मार्टन फुसोविक्स ६-४, ७-६, ६-२ ने पराभूत झाला. मेलबर्न पार्कवरील फेडररचा हा १४ वा विजय ठरला. ३६ वर्षीय फेडररने २०१५ हे वर्ष सोडले तर २००४ पासून आॅस्ट्रेलियन ओपनच्या कमीत कमी उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास गाठण्यात यश मिळवले आहे. १९ वेळा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन असलेला फेडरर हंगेरीच्या खेळाडूबद्दल म्हणाला, कीतो चांगला खेळला. आजचांगले नियोजन आणि त्याचा अवलंब करण्याची गरज होती. मी विजयानंतर आनंदी आहे.आता फेडररचा सामना बर्डीचविरुद्ध होईल. ज्याने इटलीच्या फाबियो फोगनीनीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. ३२ वर्षीय बर्डीचला गेल्या वर्षी तिसºया फेरीत फेडररकडून पराभूत व्हावे लागले होते. आता त्याला चांगल्या कामगिरीची आशा आहे. मी सर्वेश्रेष्ठ कामगिरीचा प्रयत्न करीन, असे बर्डीचने सांगितले.बोपन्ना, शरण यांचा पराभवभारताचा रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांना आपल्या जोडीदारांसह आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. तिसºया फेरीतून भारतीय जोडी बाहेर पडली. बोपन्नाने फ्रान्सच्या एडवर्ड रॉजर वेस्लिनसोबत जोडी बनवली होती. त्यांना आॅस्ट्रियाच्या ओलिवर मराच आणि क्रोएशियाच्या मॅट पाविचकडून ४-६, ७-६, ३-६ पराभूत व्हावे लागले.शरण आणि अमेरिकेचा राजीव राम या जोडीला पोलंडच्या लुकास कुबोट ब्राझिलच्या मार्सेलोे मेलोकडून ६-३, ६-७, ४-६ ने पराभूत व्हावे लागले.कर्बरनेगाळला घाममहिला गटातील चौथ्या फेरीतील सामन्यात एंजेलिक कर्बरला विजयासाठी घाम गाळावा लागला. २१ वर्षीय या खेळाडूने पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन केले. तिने तायवानच्या बिनमानांकित सीह सू वेई हिचा ४-६, ७-५, ६-२ ने पराभव केला.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपन