शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलिया आग: फेडरर-नदालचं सामाजिक भान; पुनर्वसनासाठी करणार दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 10:53 IST

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीनं 50 कोटीहून अधिक वन्य जीवांचे प्राण घेतले

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीनं 50 कोटीहून अधिक वन्य जीवांचे प्राण घेतले. ही आग आटोक्यात आणण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं पीडितांना मदत करत आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे आणि आता त्यात टेनिसपटूंचाही समावेश झाला आहे. दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडरर, राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांनी सामाजिक भान राखताना पुनर्वसनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आगीत मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी क्रीडा विश्व एकवटले आहे. टेनिस ऑस्ट्रेलियानंही पुढाकार घेताना पुनर्वसनासाठी दिग्गज खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन केले आहेत. या सामन्यात फेडरर, नदार, सेरेना यांच्यासह अनेक अव्वल खेळाडू खेळणार आहेत. 15 जानेवारीला होणाऱ्या या सामन्यातून उभा राहणारा निधी ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील टेनिसला वेगळी ओळख मिळवून देणारा निक किर्गिओसही या सामन्यात खेळणार आहेत. त्याच्यासह ग्रँड स्लॅम विजेती नाओमी ओसाका आणि कॅरोलिन वॉझ्नीआकी, तर स्टीफनोस त्सीत्सीपास हाही खेळणार आहे.

''जवळपास दोन ते अडीच तास चालणाऱ्या या सामन्यातून आम्ही जास्तीतजास्त निधी गोळा करणार आहोत. सामाजिक भान राखून आम्ही सर्व एकत्र येत आहोत,'' असे टेनिस ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी क्रेग टिली यांनी सांगितले.

टॅग्स :Australia fireऑस्ट्रेलिया भीषण आगRoger fedrerरॉजर फेडररRafael Nadalराफेल नदालserena williamsसेरेना विल्यम्सTennisटेनिस