शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एटीपी ताश्कंद ओपन : युकी भांबरीला ताश्कंद चॅलेंजरमध्ये दुहेरी यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:16 IST

भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने एटीपी ताश्कंद ओपनमध्ये एकेरीच्या दुस-या फेरीत धडक मारली असून दिवीज शरणच्या साथीने दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली.

ताश्कंद : भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने एटीपी ताश्कंद ओपनमध्ये एकेरीच्या दुसºया फेरीत धडक मारली असून दिवीज शरणच्या साथीने दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली.भांबरीने एकेरीच्या लढतीत कझाकिस्तानच्या अलेक्सांदे्र नेदोवयेसोव्हविरुद्ध ३-० ने आघाडीवर असताना अलेक्सांद्रेने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. दीड लाख अमेरिकन डॉलर पुरस्कार रक्कम असलेल्या या स्पर्धेत जागतिक मानांकनामध्ये १५२ व्या स्थानावर असलेल्या भांबरीला पुढच्या फेरीत पोलंडच्या कामिल माजशर्जाकदच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. माजशर्जाकदने आॅस्ट्रेलियाच्या मार्क पोलमांसविरुद्ध ६-४, ७-६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.दुहेरीच्या लढतीत भांबरी व डावखुरा दिवीज यांनी अव्वल मानांकित अर्जेंटिनाची जोडीगुइल्लेर्मो दुरान व आंद्रेस मोलतेनी यांचा पहिल्या फेरीत ६-४, ६-२ ने पराभव केला. पुढच्या फेरीत त्यांना युक्रेनच्या डेनेस मोलचानोव्ह व मोनाकोच्या रोमॅन अर्नेओदो या जोडीसोबत लढत द्यावी लागेल. स्पर्धेत चौथे मानांकन प्राप्त भारतीय जोडी जीवन नेदुंचेझियान व विष्णू वर्धन यांना इटलीच्या थॉमस फाब्बियानो व स्वित्झर्लंडच्या लुका मार्गारोली या जोडीविरुद्ध ६-७, ६-७ ने पराभव स्वीकारावा लागला.दरम्यान, शांघाय मास्टर्समध्ये रोहन बोपन्ना व पाब्लो क्युवास या जोडीला पहिल्या फेरीत निक कर्गियोस व लुकास पोयुल्ले यांच्याविरुद्ध ६-३, ३-६, ५-१० ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हविरुद्ध डेव्हिस कप स्पर्धेतील लढत माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम लढतींपैकी एक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने व्यक्त केली.डेव्हिस कप स्पर्धेत भारताला वर्चस्व गाजविण्यासाठी मानांकनामध्ये अव्वल ५० मधील खेळाडू संघात हवेत, असेही त्याने म्हटले आहे.भांबरीला ३ तास ५२ मिनिटे रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत १८ वर्षीय शापोवालोव्हविरुद्ध ६-७, ४-६, ७-६, ६-४, १-६ ने पराभव स्वीकारावा लागला होता.

टॅग्स :Sportsक्रीडा