शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एटीपी फायनल्स; फेड एक्सप्रेस सुसाट, दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:09 IST

आपली गणना दिग्गज खेळाडूंमध्ये का होते हे पुन्हा एकदा सिद्ध करताना स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने पिछाडीवरुन बाजी मारताना एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

लंडन : आपली गणना दिग्गज खेळाडूंमध्ये का होते हे पुन्हा एकदा सिद्ध करताना स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने पिछाडीवरुन बाजी मारताना एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात फेडने पहिला सेट गमावल्यानंतर क्रोएशियाच्या मरिन सिलिचचे कडवे आव्हान २-१ असे परतावले. अन्य एका सामन्यात बाजी मारताना अमेरिकेच्या जॅक सोक याने उपांत्य फेरीत प्रवेश केला.विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला फेड यंदाच्या मोसमात सुसाट खेळत आहे. यंदा दोन ग्रँडस्लॅम पटकावतानाच फेड आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी खेळाडू फेडपुढे खेळताना अडखळताना दिसत आहेत.गेल्या काही स्पर्धांपासून चमकदार कामगिरी करत असलेल्या सिलिचने फेडविरुद्ध पहिला सेट जिंकून आश्चर्यकारक आघाडी घेतली खरी, पण ही आघाडी कायम राखण्यात त्याला यश आले नाही.पहिला सेट टायब्रेकमध्ये गमावल्यानंतर फेडने सिलिचला टेनिसचे धडे देताना ६-७, ६-४, ६-१ असे सहज पराभूत केले. उपांत्य फेरीत फेडपुढे बेल्जियमचा डेव्हीड गॉफिन किंवा आॅस्ट्रियाचा डॉमनिक थिएम यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल.दुसरीकडे, जॅकने शानदार कामगिरी करताना गेल्या दहा वर्षांमध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचणारा पहिला अमेरिकन खेळाडू असा मान मिळवला. याआधी २००७ साली अँडी रॉडिक याने एटीपी फायनलच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. तीन सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत जॅकने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवचे कडवे आव्हान६-४, १-६, ६-४ असे परतावले.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडरर