शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एटीपी फायनल्स टेनिस: अलेक्झांडर झ्वेरेव उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 01:44 IST

नदाल, फेडरर स्पर्धेबाहेर

लंडन : गतविजेता अलेक्झांडर झ्वरेव याने निर्णायक सामन्यात डेनिल मेदवेदेवचा पराभव करत एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी स्पेनच्या राफेल नदालचे आव्हान संपुष्टात आले. त्याने आतापर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. दुसरीकडे, सहावेळचा विजेता दिग्गज रॉजर फेडरर उपांत्य फेरीत पराभूत झाला.नदालने स्टेफानोस सिटसिपासविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर ६-७ (४/७), ६-४, ७-५ असा विजय मिळवला. मात्र, यानंतरही त्याचे स्पर्धेतील भवितव्य झ्वेरेव विरुद्ध मेदवेदेव या सामन्यावर होते. झ्वरेवने मेदवेदेवला ६-४, ७-६ (७-४) असे नमविले. सिटसिपासने यापूर्वीच अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता. ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासने शनिवारी रात्री उपांत्य फेरीत खळबळजनक निकाल लावताना दिग्गज फेडररचे आव्हान ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. सिटसिपासने आपल्या पहिल्याच प्रयत्नात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. (वृत्तसंस्था)नदालचे एटीपी फायनल्स जेतेपदाचे हे स्वप्न यंदाही अधुरे राहिले. यानंतरही त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर कब्जा केला. दुखापतीचा सामना केल्यानंतर नदालने लंडनमध्ये सुरुवात केली.स्पर्धेत त्याची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात तो पराभूत झाला होता. त्यानंतर नदालने डेनिल मेदवेदेव आणि स्टेफनोस सिटसिपास यांना पराभूत केले. मात्र हा निकाल त्याला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पुरेसा ठरला नाही. सर्बियाचा नोव्हाक जोकोविचही उपांत्य फेरी गाठू न शकल्याने नदालचे अव्वल स्थान निश्चित झाले. पाचव्यांदा नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.