शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एटीपी चँलेंजर टेनिस : युकी भांबरी, रामकुमार रामनाथन अंतिम फेरीत, भारतीय खेळाडूंमध्ये रंगणार जेतेपदाची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:56 IST

भारताचा स्टार एकेरी टेनिसपटू युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना एमएसएलटीए एटीपी चँलेंजर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

मुंबई : भारताचा स्टार एकेरी टेनिसपटू युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना एमएसएलटीए एटीपी चँलेंजर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. युकीने एकतर्फी झालेल्या सामन्यात स्पेनच्या अ‍ॅड्रियन मेनेंदेझ - मॅसेरिअस याला २-० असे सहज लोळवले. दुसरीकडे रामकुमारने भारताच्याच साकेत मायनेनीचे आव्हान संपुष्टात आणले.महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत १३७व्या स्थानी असलेल्या युकीने आपली विजयी घोडदौड कायम राखली. त्याने जागतिक क्रमवारीत १२७व्या स्थानी असलेल्या आणि स्पर्धेत दुसरे मानांकन लाभलेल्या अ‍ॅड्रियनचा ६-२, ६-४ असा सहजपणे धुव्वा उडवला. बॅकहँड आणि फोरहँड या फटक्याच्या जोरावर युकीने अ‍ॅड्रियनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.दुसरीकडे, भारतीयांमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात रामकुमारने आपला धडाकेबाज खेळ कायम ठेवत बलाढ्य साकेत मायनेनीचे तगडे आव्हान दोन सेटमध्ये ६-३, ६-२ असे परतावले. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या साकेतने शानदार खेळ करताना उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. परंतु, सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रामकुमारपुढे त्याचा निभाव लागला नाही.