शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन पुरस्कारानंतर आता ‘खेलरत्न’वर नजर : बोपन्ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:02 IST

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहण बोपन्ना याला यंदा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. दुहेरीचा अनुभवी खेळाडू असलेला रोहण पुरस्कारावर खूश असून आता सर्वोच्च ‘खेलरत्न’साठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्याने व्यक्त केले.

नवी दिल्ली - भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहण बोपन्ना याला यंदा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. दुहेरीचा अनुभवी खेळाडू असलेला रोहण पुरस्कारावर खूश असून आता सर्वोच्च ‘खेलरत्न’साठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्याने व्यक्त केले.विशेष असे की ३८ वर्षांच्या रोहणच्या नावाची शिफारस खेलरत्नसाठी देखील करण्यात आली होती, पण जकार्ता येथील आशियाई स्पर्धेचे दुहेरीत सुवर्ण विजेत्या या खेळाडूची अर्जुन पुरस्कारावर बोळवण करण्यात आली. २५ सप्टेंबर रोजी राष्टÑपती भवनात पुरस्कार वितरण होणार आहे. बोपन्ना पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वत: राष्ट्रपती भवनात उपस्थित राहू शकणार नाही. त्यावेळी तो चीनमधील चेंगदू ओपन स्पर्धेत खेळत असेल.अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद बोपन्नाच्या चेहऱ्यावर झळकत होता. तो म्हणाला,‘ अर्जुन पुरस्कारासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. तरीही प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात राष्ट्रीय पुरस्काराचे विशेष महत्त्व असते.’रोहणसाठी मागचे सत्र अतिशय निराशादायी ठरले. यावर तो म्हणतो,‘होय, मागच्या वर्षी माझी पुरस्कारासाठी निवड झाली नाही. यामुळे फार दुखावलो होतो. यंदा माझा विचार झालाच. कामगिरीत आणखी भर घालण्यासाठी मी झटणार आहे. कामगिरीच्या बळावर मला खेलरत्न मिळवायचा आहे. यानंतर माझे टार्गेट ‘खेलरत्न’ असेल.(वृत्तसंस्था)

टॅग्स :Tennisटेनिसnewsबातम्या